Join us

​अयान मुखर्जीच्या आगामी चित्रपटात रनबीर कपूर दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 21:24 IST

बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जीने आपल्या आगामी चित्रपटाचा खुलासा केला आहे. त्याचा आगामी चित्रपट रोमाँटिक फँटसी असून या चित्रपटात बॉलिवूड ...

बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जीने आपल्या आगामी चित्रपटाचा खुलासा केला आहे. त्याचा आगामी चित्रपट रोमाँटिक फँटसी असून या चित्रपटात बॉलिवूड स्टार रनबीर कपूर सुपर पावर असलेल्या नायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अयानने रनबीर कपूरसोबत ‘वेक अप सिड’ व ‘ये जवानी है दिवानी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. अयान मुखर्जी म्हणाला, मी अद्याप आपल्या आगामी चित्रपटाचे नाव फायनल केले नाही. रनबीरने माझ्यासोबत या आधी काम केले असल्याने मी त्याला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याबद्दल विचारले होते. त्याने मला होकार कळविला आहे. त्याच्यासोबत नायिका म्हणून आलिया भट्ट दिसेल. या चित्रपटातील नायकाला सुपरपावर्स मिळाले आहे. मानसाचा व आगीचा फार जवळचा संबंध आहे. या चित्रपटातील नायकाचा आगीशी जवळचा संबंध दिसेल, यामुळे आम्ही या चित्रपटाला ड्रॅगन हे नाव दिले आहे. मात्र हे नाव बदलले जाऊ शकते. रनबीर सध्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित करीत असलेल्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची शूटिंग मे महिन्यापर्यंत संपेल असा अंदाज आहे. आम्ही आॅगस्ट महिन्यापासून शूटिंगला सुरुवात करण्याचा विचार करीत आहो. या चित्रपटासाठी आम्हाला बरीच मेहनत करावी लागू शकते. रनबीरने तशी तयारी दर्शविली आहे. कदाचित हा चित्रपटाची शूटिंग दीर्घ काळ चालेल. या चित्रपटात अनेक गोष्टी आहेत. डान्स, ड्रामा, अ‍ॅक्शन, फिक्शन असे बरेच काही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट चाहत्यांसाठी बरेच काही घेऊन येऊ शकतो असेही अयान म्हणला. अयान मुखर्जीच्या वेक अप सिड या चित्रपटातील भूमिकेसाठी रणबीरची प्रशंसा झाली होती. काही दिवसांपूर्वी रनबीर कपूरला ध्यानचंद यांच्या बायोपिकची आॅफर मिळाल्याची बातमी चांगलीच व्हायरल झाली होती.