Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैन्य अधिकारी झळकले सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात; तेही खलनायकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 19:32 IST

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'राधे युवर मोस्ट वॉण्टेड भाई' १३ मे रोजी रिलीज झाला.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'राधे युवर मोस्ट वॉण्टेड भाई' १३ मे रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणदीप हुडाने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. तर रणदीपसोबत गौतम गुलाटी आणि सांगे शेल्ट्रिम होते. सांगे शेल्ट्रिम हे एक माजी सैन्य अधिकारी आहे. 

सांगे शेल्ट्रिम हे भूतानच्या सैन्यात होते. त्यांनी राधे चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. त्यांनी गुन्हेगाराची भूमिका साकारली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, सांगे शेल्ट्रिम यांनी सांगितले की, मी बालपणापासून सलमान खानचे चित्रपट पाहत आहे. बॉलिवूड पदार्पणाबाबत मी कधीच विचार केला नव्हता. पण कदाचित सलमानसोबत काम करणे हे माझ्या नशिबात लिहिले होते. त्यांच्यामुळेच मला चित्रपटात भूमिका मिळाली.

भविष्यात मोठ्या भूमिका मिळाल्या तर मी ११० टक्के मन लावून काम करेन, असे सांगे शेल्ट्रिम म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, मी स्वत: सैन्यात अधिकारी होतो, म्हणून सैन्य अधिकाऱ्याची भूमिका एकदा तरी मिळावी अशी माझी इच्छा आहे. याशिवाय मला अॅक्शन हीरोचीही भूमिका करायला आवडेल.

सैन्य दलातील अधिकाऱ्यापासून बॉडी बिल्डरपर्यंतच्या माझ्या प्रवासाने मला अभिनेता होण्यास प्रवृत्त केले. अभिनेता होण्याचं माझं स्वप्न किंवा महत्त्वाकांक्षा नव्हती. मी चुकून या क्षेत्रात आलो, असे सांगे यांनी सांगितले.

टॅग्स :सलमान खानरणदीप हुडा