Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधून गायब झालेल्या या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, दिसला संजय दत्तच्या पार्टीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:38 IST

संजय दत्तने नुकताच ६०वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सेलिब्रेटी व कुटुंबातील मंडळींनी हजेरी लावली होती.

सुपरस्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून गायब आहेत. प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यात ते कमी वेळा स्पॉट होतात. इव्हेंट, अवॉर्ड शो आणि बॉलिवूड पार्टीमध्ये कुमार गौरव कधी दिसत नाहीत. कधी बी-टाऊनचे चॉकलेट हिरो कुमार गौरव आता ओळखता येत नाहीत. नुकतंच त्यांना बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तच्या बर्थडे पार्टीत स्पॉट केलं. ते संजय दत्तची बहिण नम्रता दत्तचे पती आहेत. बऱ्याच काळानंतर दत्त कुटुंबाच्या पार्टीत कुमार गौरव पहायला मिळाले. फोटोंमध्ये ५९ वर्षांचे कुमार गौरव यांना ओळखताही येत नाही. ते ब्लू शर्ट आणि डेनिम जिन्समध्ये पहायला मिळाले. त्यांनी चश्मा घातला होता. ते आपल्या पत्नीसोबत संजय दत्तच्या पार्टीत गेले होते. 

जेव्हा कुमार गौरव यांनी सिनेमात एन्ट्री घेतली होती तेव्हा वाटलं होतं की ते त्यांच्या वडिलांसारखे हिट ठरतील. मात्र कुमार गौरव यांना सिनेमात अपयश आलं.

कुमार गौरव यांनी १९८१ साली लव स्टोरी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सुपरहिट चित्रपट होता.

 

यानंतर त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केलं. मात्र यशस्वी अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करू शकले नाहीत. 

कुमार गौरव यांची संजय दत्तसोबत एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं नाम. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र हे यश कुमार गौरव यांच्या करियरला गती देऊ शकला नाही. संजय दत्तसोबत कुमार गौरव यांचा काँटे सुपरहिट ठरला.

टॅग्स :संजय दत्त