Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजाच्या भूमिकेनंतर शाहिद कपूर 'या' चित्रपटात साकारणार वकिलाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 12:10 IST

नुकताच शाहिद कपूर लंडनवरुन व्हेकेशन एन्जॉय करुन परतला आहे. मीशाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी शाहिद पत्नी मीरा राजपूतसह आणि ...

नुकताच शाहिद कपूर लंडनवरुन व्हेकेशन एन्जॉय करुन परतला आहे. मीशाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी शाहिद पत्नी मीरा राजपूतसह आणि कुटुंबीयासह लंडनला गेला होता. व्हेकेशन एन्जॉय केल्यानंतर शाहिद पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज झाला आहे. शाहिदचा आगामी चित्रपट पद्मावती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचित्रपटात तो राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजेच राणी पद्मावतीच्या पतीची भूमिका तो साकारणार आहे. राणी पद्मावतीची भूमिका अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये धूम उडवून देण्यास सज्ज आहे. पद्मावतीनंतर शाहिद त्याच्या आगामी चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणार आहे.  ALSO READ : मम्मी-पप्पासोबत केक कापताना दिसली चिमुकली मीशा!मिड-डे-वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार शाहिद कपूर टॉयलेट एक प्रेमकथाचा दिग्दर्शक श्री नारायण सिंगच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा विपुल के रावल लिहिणार आहे. विपुलने याआधी अक्षय कुमार स्टारर रुस्तम चित्रपटाची कथासुद्धा लिहिली होती. याचित्रपटाची कथा एक सामान्य माणसाला आलेल्या लांबलचक वीजेच्या बीलावर आधारित आहे. एका सामान्य माणसाला वीज कंपन्यांकडून  मोठ्या रक्कमेची बीलं येणे ही सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. यात वकीलाची भूमिका शाहिद कपूर साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजून या चित्रपटातील अभिनेत्री शोध सुरु आहे. अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांने काही अभिनेत्रींना अप्रोचसुद्धा केला आहे. या चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षीपासून सुरु करण्यात येणार आहे. चित्रपटाचे नाव कथेला बघून रोशनी ठेवण्यात येणार आहे. शाहिद कपूरने राजाची भूमिका साकारल्यानंतर तो त्याच्या फॅन्सना पुढच्या वर्षी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याचा हाही चित्रपट पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स नक्कीच खूश असतील यात काही शंका नाही.