Join us

उडता पंजाब पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 16:16 IST

           कोणत्याही चित्रपटाची जान हे त्या चित्रपटाचे पोस्टरच असते. प्रेक्षकांना एकदा का पोस्टर आवडले की ...

           कोणत्याही चित्रपटाची जान हे त्या चित्रपटाचे पोस्टरच असते. प्रेक्षकांना एकदा का पोस्टर आवडले की त्या सिनेमात नक्की काय असेल याची उत्सुकता लागते अन चित्रपट सुपरहिट देखील होऊ शकतो. त्यामुळे पोस्टर तयार करताना ते प्रेक्षकांना अपील होईल याची पुरेपुर काळजी घ्यावी लागते. असाच एक चित्रपट उडता पंजाबची सध्या जोरदार चर्चा सुरु होती. या चित्रपटात शाहिद आणि करीना एकत्र झळकणार असल्याचे बोलले जात होते. यामध्ये किती खरे किती खोटे ते येणारा काळच ठरवेल परंतू जर या चित्रपटात शाहीद-करीनाची जोडी झळकली तर नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी ही गुड न्युज असेल. एवढेच नाही तर या दोघांसोबत आपली चुलबुली गर्ल आलिया भट सुद्धा असणार आहे. आता एवढी चांगली स्टारकास्ट अन चित्रपटा पुर्वीचे गॉसिपिंग म्हटल्यावर नक्कीच त्या चित्रपटाचा फस्ट लुक किंवा पोस्टर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतीलच. नूकतेच या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर आऊट झाले आहे. आता पाहुयात चित्रपटाची पहिली झलक आपल्याला केव्हा पहायला मिळते.