'उडता पंजाब' चित्रपटामध्ये फक्त एक कट करुन रिलीजसाठी मंजुरी देण्याचे आदेश उच्च न्यायलयाने सेन्सॉर बोडार्ला दिले आहेत. यासोबतच न्यायालयाने सेन्सॉर बोडार्ला 48 तासांमध्ये नवं 'ए' प्रमाणपत्र देण्याचे आदेशही दिले आहेत. सेन्सॉर बोडार्ने स्थगिती देण्याची केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. डिस्क्लेमरमध्ये तीन बदल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 17 जूनला चित्रपट रिलीज होणार आहे.
सेन्सॉर बोडार्ने आक्षेप घेतल्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला होता. सोमवारी न्यायालयाने फक्त एका कटसहित हा चित्रपट रिलीज करा असं सांगितलं आहे. चित्रपटात शाहिद कपूर लोकांसमोर लघुशंका करतानाचा सीन कट करण्यास सांगण्यात आलं आहे. ही सीन गरजेचा आहे असं वाटत नसल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. पंजाब हरितक्रांती झालेली जमीन आहे, शूर सैनिक येथे जन्माला आलेत, फक्त एका वाक्याने प्रतिमेवर परिणाम होणार नाही न्यायालयाने म्हटलं आहे.
उडता पंजाब चित्रपटावर सेन्सॉर बोडार्ने आक्षेप घेतल्यानंतर हा वाद सुरु झाला होता. चित्रपटाच्या शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाका असा आदेश सेन्सॉर बोडार्ने दिला होता. सोबतच चित्रपटातील 89 कट्सही होते. ह्यउडता पंजाबह्ण चित्रपटात पंजाबला ड्रग्जमुळे होणारा त्रास दाखवण्यात आला आहे. अभिषेक चौबे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक चौबे यांचा हा तिसरा चित्रपट असून, दिग्दर्शक म्हणून याअगोदर ह्यईश्कियाह्ण, ह्यदेढ इश्कियाह्ण हे चित्रपट त्यांनी साकारले आहेत. चित्रपटात शाहिद कपूर, करिना कपूर-खान, आलिया भट्ट आणि पंजाबी सुपरस्टार दिलजित दोसंग यांच्या प्रमुख भुमिका आहेत. }}}}