Join us  

Fitness : पन्नाशीनंतरचे फिटनेस फिक्र स्टार्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 7:31 AM

-रवींद्र मोरेबॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळख निर्माण आपल्याला जेवढे सोपे वाटते तेवढे सोपे काम नाही. शूटिंगसाठी सततची ...

-रवींद्र मोरेबॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळख निर्माण आपल्याला जेवढे सोपे वाटते तेवढे सोपे काम नाही. शूटिंगसाठी सततची धावपळ, त्यातच स्वत:चे फिटनेस टिकविण्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार आणि  शिस्तप्रिय जीवनशैली आदींचेही पालन करणे  आवश्यक असते. या सर्व गोष्टींवर मात करत असतानाच अनेक स्टार्स कालबाह्य झाल्याचे उदाहरणे अनेक आहेत, मात्र काही स्टार्स असेही आहेत ज्यांनी वयाच्या पन्नाशी नंतरही आपले फिटनेस टिकवून बॉलिवूडमध्ये दबदबा कायम ठेवला आहे. अशाच काही स्टार्सच्या बाबतीत घेतलेला हा वृत्तांत. * शाहरुख खान २ नोव्हेंबर, १९६५ मध्ये जन्मलेला बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने आजपर्यंत कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर ताबा मिळविला आहे. शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. आज वयाच्या ५२ व्या वर्षीही शाहरुखने खूपच कष्ट करुन आपले फिटनेस टिकविले आहे, शिवाय आपल्या अभियन कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये दबदबा कायम ठेवला आहे. * सलमान खानबॉलिवूड दबंग सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर, १९६५ मध्ये झाला आहे. सलमान खानदेखील ५२ वर्षाचा झाला असून बॉलिवूडमध्ये त्याने जे स्थान निर्माण केले आहे ते अविश्वसनिय आहे. विशेष म्हणजे आजही सलमानचे सिक्स पॅक अ‍ॅब्स पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचते. अतिशय बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून सलमानने आपले फिटनेस टिकविले असून आजच्या तरुणाईसाठी तो एक आदर्श आहे.  * अक्षय कुमार अतिशय कठोर दिनचर्या, आरोग्यदायी आहार, वाईट सवयींपासून परावृत्त तसेच नियमित व्यायाम आदी सवयींच्या जोरावर वयाच्या ५० व्या वर्षीही अक्षय कुमार अत्यंत फिट आहे. ९ सप्टेंबर, १९६७ मध्ये जन्मलेल्या अक्षयने स्वत:ला एवढे फिट ठेवले आहे की, त्याचा हेवा इतर स्टारही करतात. आजही अक्षय चित्रपटात अ‍ॅक्शन स्टंट स्वत:च करतो हे विशेष. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या अक्षयने स्वत:चे फिटनेस टिकवून आज बॉलिवूडमध्ये दबदबा कायम ठेवला आहे. * सुनील शेट्टीविनोदी तसेच अ‍ॅक्शन चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा सुनील शेट्टीचे फिटनेस आज वयाच्या ५६ व्या वर्षीही टिकून आहे. ११ आॅगस्ट, १९६१ रोजी जन्मलेला सुनील शेट्टी अभिनेता बरोबरच यशस्वी उद्योजकदेखील आहे. फिटनेस फिक्र सुनील शेट्टी रेगुलर जिम करण्याबरोबरच  स्ट्रिक्ट डायटदेखील फॉलो करतो. विशेष म्हणजे जंक फूडपासून दूर राहून बाहेरच्या खाण्याऐवजी घरचेच खाणे पसंत करतो.    * आमिर खानबॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज वयाच्या ५३ व्या वर्षीही एवढा फिट आहे की, तो आपल्या मर्जीप्रमाणे म्हणजेच चित्रपटातील भूमिकेप्रमाणे आपल्या शरीरात बदल करु शकतो. गजनी चित्रपटातील आमिरने जी बॉडी बनविली होती, त्याची प्रशंसा केली तेवढी कमी आहे. शिवाय धूम 3 आणि दंगल मध्येही आमिरने ज्या पद्धतीने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले यावरु न दिसते की, आमिर फिटनेससाठी किती तत्पर आहे.