Join us

पहिल्यांदा ऋषी कपूरसोबत दिसणार नीना गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 17:30 IST

पहिल्यांदा ऋषी कपूर आणि नीना गुप्ता एकत्र दिसणार आहे. नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर काम मागितले होते. अनुभव सिन्हाच्या चित्रपट ...

पहिल्यांदा ऋषी कपूर आणि नीना गुप्ता एकत्र दिसणार आहे. नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर काम मागितले होते. अनुभव सिन्हाच्या चित्रपट ऋषी कपूर आणि नीना एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता फिल्मकार अनुभव सिन्हाच्या मुल्क चित्रपटात झळकणार आहेत. अभिनेता ऋषी कपूरने दिलेल्या वक्तव्यानुसार, नीना या चित्रपटात ऋषी कपूरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत. त्यांनी या भूमिकेसाठी तयारी सुद्धा सुरु केली आहे. नीना यांनी सांगितले, अनुभवसोबत माझी भेट अशावेळी झाली जेव्हा मी चांगल्या कामाच्या शोधात होते. मुल्कमध्ये काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. हा एक अभूतपूर्व चित्रपट आहे.  नीनाने ऑगस्टमध्ये इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमधून त्यांनी सुचवले होते की त्यांना काम हवे आहे. त्यांनी लिहिले होते,  मी मुंबईत राहते आणि मी काम करते, मी एक चांगली अभिनेत्री आहे आणि चांगल्या भूमिका साकारण्याचू माझी इच्छा आहे. अनुभव सिन्हाला नीना गुप्ता यांचे काम आधीपासूनच आवडते. तो म्हणाला, नीना या भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत. त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट बघून मी लगेच त्यांना फोन केला. मुल्क चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. यात तापसी पन्नू आणि प्रतिक बब्बर यांच्यादेखील भूमिका आहेत.  हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जेव्हा नीनाने इन्स्टाग्रामवर काम मागितले होते. हा फोटो नीनाची मुलगी मसाबा हिने आपल्या अकाऊंटवरुन शेअर करत एक कॅप्शन लिहिले होते, काही दिवसांपूर्वीच मी कोणाला तरी म्हटले होते मला काम मागण्यात कोणताच कमी पणा नाही वाटत किंवा लाज ही नाही वाटत. माझ्या आईने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. नॅशनल अॅवॉऱ्ड विनर माझी आई मला काम करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देते. नीना गुप्ताने शेअर केलेल्या या फोटोंने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. या लिस्टमध्ये बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रासह अनेकांची नाव सामील आहेत.