Join us

पहिल्यांदाच पप्पा अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार हर्षवर्धन कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 22:15 IST

या वर्षात अभिनेता अनिल कपूर याने पहिल्यांदाच पुतण्या अर्जुन कपूरसोबत स्क्रीन शेअर केली. अर्जुन आणि अनिलची जोडी प्रेक्षकांना खूपच ...

या वर्षात अभिनेता अनिल कपूर याने पहिल्यांदाच पुतण्या अर्जुन कपूरसोबत स्क्रीन शेअर केली. अर्जुन आणि अनिलची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. कारण चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला. आता तर या ‘मुबारकां’ या चित्रपटाच्या सीक्वलची डिमांड केली जात आहे. आता कपूर खानदानाकडून आणखी एक खुशखबरी येत आहे. होय, असे म्हटले जात आहे की, लवकरच अभिनेता हर्षवर्धन कपूर पप्पा अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हर्षवर्धन लवकरच नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यावरील बायोपिकला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात हर्षवर्धनचे पप्पा अनिल कपूरही बघावयास मिळणार आहेत. ही बातमी हर्षवर्धन याने स्वत: कन्फर्म केल्याने यावर्षी पुन्हा एकदा बाप-बेट्याचा जलवा स्क्रीनवर बघावयास मिळणार आहे. दरम्यान, हर्षवर्धनने ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करताना याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटनुसार असे वाटत आहे की, अनिल कपूर आता रिल लाइफमध्ये हर्षवर्धनचे पप्पा बनणार आहेत. याचा अर्थ असा की, अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर बाप-मुलाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. खरं तर या दोघांना पडद्यावर बघणे प्रेक्षकांसाठीही एक चांगला अनुभव ठरू शकणार आहे. असो, हर्षवर्धनच्या फिल्मी करिअरविषयी सांगायचे झाल्यास, त्याने ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला. परंतु हर्षवर्धनच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले. या चित्रपटानंतर हर्षवर्धन दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘भावेश जोशी’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून, हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. तर पप्पा अनिल कपूर ऐश्वर्या राय-बच्चन आणि राजकुमार राव यांच्यासोबत ‘फन्ने खां’ नावाच्या चित्रपटामध्ये सध्या व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अनिल कपूरचा लूक समोर आला होता. त्याचा हा लूक प्रेक्षकांना चांगलाच पसंत आला.