Join us

​ट्रेलरपेक्षाही बोल्ड आहे ‘हेट स्टोरी4’चे पहिले गाणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 12:36 IST

‘हेट स्टोरी4’ या चित्रपटात उर्वशी अतिशय बोल्ड अवतारात दिसणार आहे. ट्रेलरवरून याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. पण आता उर्वशीचा ट्रेलरपेक्षाही बोल्ड अंदाज समोर आला आहे.

सन २०१२ मध्ये आलेल्या पाऊली डॅमच्या ‘हेट स्टोरी’ची फ्रेंचाइजी ‘हेट स्टोरी4’चा ट्रेलर आपण पाहिला असेलच. या ट्रेलरमधला अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हॉट अंदाजही तुम्ही बघितला असेल. या चित्रपटात उर्वशी अतिशय बोल्ड अवतारात दिसणार आहे. ट्रेलरवरून याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. पण आता उर्वशीचा ट्रेलरपेक्षाही बोल्ड अंदाज समोर आला आहे. होय, मेकर्सने ‘हेट स्टोरी4’चे पहिले गाणे रिलीज केलेय. या गाण्यात उर्वशी कधी नव्हे इतकी बोल्ड दिसतेय. ‘आशिक बनाया आपने’ असे या गाण्याचे शब्द आहेत. आता हे गाणे यापूर्वीही तुम्ही ऐकलेय, हे आम्ही सांगायला नकोच. २००५ मध्ये आलेल्या इमरान हाश्मीच्या ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटाचे हे टायटल सॉन्ग होते. याच टायटल सॉन्गचा रिमेक ‘हेट स्टोरी4’मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे.‘आशिक बनाया आपने’या गाण्यावर तुम्ही तनुश्री दत्ताला थिरकताना पाहिले होते. ‘हेट स्टोरी4’च्या या गाण्याच्या रिमेकमध्ये आता उर्वशीच्या हॉट अदा तुम्हाला पाहता येणार आहेत.आधी हा चित्रपट २ मार्चला रिलीज होणार होता. पण आता तो ९ मार्चला रिलीज होणार आहे. उर्वशीसोबत अभिनेता करण वाही यात लीड रोलमध्ये आहे. याशिवाय एक नवा चेहराही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  पंजाबी अभिनेत्री इहाना ढिल्लन या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. सूरज पांचोली आणि गुरमीत चौधरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.ALSO READ : Hate Story 4 Trailer : उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अंदाजाची पाहा झलक!‘हेट स्टोरी’बॉक्सआॅफिसवर एक हिट फ्रेंचाइजी आहे. सस्पेन्स, थ्रील आणि बोल्डनेस असा सगळा मसाला असल्यामुळे ही फ्रेंचाइजी इतकी हिट ठरलीय. ही फ्रेंचाइजी इरोटिक कन्टेन्टसाठी ओळखली जाते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘हेट स्टोरी’ने याची सुरुवात झाली होती. यात अभिनेत्री पाऊली डॅम मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर आलेल्या ‘हेट स्टोरी2’मध्ये सुरवीन चावला फिमेल लीडमध्ये होती. तर ‘हेट स्टोरी3’मध्ये जरीन खानने लीड भूमिका साकारली होती. ‘हेट स्टोरी4’मध्ये ही जागा उर्वशीने घेतली आहे.