Join us

Parineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा शाही लग्नानंतर पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 09:10 IST

परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी उदयपूरमध्ये पंजाबी रितीरिवाजाप्रमाणे लग्न केलं. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा होती. अखेर २४ सप्टेंबर पारंपारिक पंजाबी पद्धतीने शाही थाटात हा विवाह सोहळा पार पडला. उदयपूर मध्ये लीला पॅलेसमध्ये दोघे लग्न बंधनात अडकले. दोघांच्या लग्नातील फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर होते. परिणीतीचा लग्नाच्या रिसेप्शनमधील पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. 

फोटोत परिणीतीने गुलाबी रंगाची शिमरची साडी नेसलेली दिसतेय.  गळ्यात हिऱ्यांचा मोठासा नेकलेस, हातात गुलाबी चुडा, आणि भांगेत कुंकू या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तर राघवही काळ्या रंगाच्या सूटमध्ये हँडसम दिसतोय.  दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. 

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच हजर होती. मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा,  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पंजाबचे मुख्यमंत्री भगंवत मान आणि आदित्य ठाकरे उपस्थिती होते. 

अशी सुरु झाली लव्हस्टोरीपरिणीती आणि राघव चढ्ढांची लव्हस्टोरी एकदम खास आहे. दोघांची पहिली भेट विदेशात झाली. परिणीती चोप्रा यूकेमधील मँचेस्टर विद्यापीठात व्यवसाय, अर्थशास्त्र आणि वित्त विषयात पदवी अभ्यासक्रम करत होती. राघव चढ्ढाही त्याच वेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते आणि  दोघांची ओळख तिथेच झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीआप