हा पाहा ईशा देओलच्या मुलीचा पहिला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 14:56 IST
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लाडकी लेक अभिनेत्री ईशा देओलने एका गोंडस बाळाला काल रात्री सव्वा अकरा वाजता जन्म ...
हा पाहा ईशा देओलच्या मुलीचा पहिला फोटो
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लाडकी लेक अभिनेत्री ईशा देओलने एका गोंडस बाळाला काल रात्री सव्वा अकरा वाजता जन्म दिला. सध्या ईशा देओल आणि तिचे पती भरत तख्तानीवर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ईशा आणि भरत यांचे हे पहिलेच मूल आहे. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ईशाने गोंडस बाळाला जन्म दिला. आता ईशाला हिंदुजा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. ईशा आणि तिचे पती भरत त्यांच्या परीला घेऊन घरी जायला देखील निघाले आहेत. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर ईशा आणि भरत यांनी मीडियाच्या प्रतिनिधींना फोटोसाठी पोझ दिली. पांढऱ्या कपड्यांमध्ये त्यांच्या या चिमुकलीला त्यांनी लपेटलेले होते. तिचा चेहरा दिसू नये म्हणून भरतने तिला व्यवस्थित पकडले होते. या फोटोत इशा खूपच खूश असल्याचे आपल्याला दिसून आले. इशा या फोटोत स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहे. त्याचसोबत या फोटोत आपल्याला भरतचे आईवडील देखील पाहायला मिळत आहेत. प्रेग्नन्सी दरम्यान ईशाने अनेकवेळा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले होते. तिच्या फोटोंजना सोशल मीडियावर भरभरून लाईक्स आणि कमेंटक्सदेखील मिळाल्या होत्या. २०१२च्या फेब्रुवारीमध्ये ईशाने उद्योगपती भरत तख्तानीसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यातच जूनमध्ये त्या दोघांनी लग्न केले होते. ईशाच्या लग्नात बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर पाच वर्षांनी ईशा प्रेग्नंट असल्याची बातमी आई हेमा मालिनी यांनी ट्वीटरद्वारे दिली होती. ईशाने ‘एलओसी कारगिल, युवा, धुम, आॅँखे आणि कॅश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर ईशाने इंडस्ट्रीत राहण्यास फारसा उत्साह दाखविला नाही. ती २०१५ मध्ये कन्नड चित्रपट ‘केअर आॅफ फुटपाथ’मध्ये पाहावयास मिळाली होती. हेमा मालिनी दुसऱ्यांदा आजी बनल्या आहेत. कारण काही वर्षांपूर्वीच हेमा आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अाहाना हिने डेरिनला जन्म दिला होता. त्यामुळे ईशाच्याही आयुष्यात चिमुकल्या बाळाचे आगमन व्हावे, अशी तिच्या आईची इच्छा होती. ईशाने आईची ही इच्छा पूर्ण केली असल्याने सध्या त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. Also Read : गर्भवती ईशा देओल पुन्हा करणार लग्न !