First look : ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’मध्ये बहरणार केशव अन् जयाची लव्हस्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 12:45 IST
अक्षय कुमार आणि भूमी पेडनेकर यांचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे शूटींग संपले आहे. इकडे शूटींग संपले आणि तिकडे ...
First look : ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’मध्ये बहरणार केशव अन् जयाची लव्हस्टोरी!
अक्षय कुमार आणि भूमी पेडनेकर यांचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे शूटींग संपले आहे. इकडे शूटींग संपले आणि तिकडे अक्षय कुमारने या चित्रपटाचे फर्स्ट लूक जारी केले. सोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर केली.यात अक्षय व भूमी दोघेही नवरदेव-नवरीच्या रूपात दिसत आहेत.या चित्रपटात अक्षय केशव नामक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे तर भूमी जया नामक मुलीची भूमिका साकारताना दिसतेय. खुद्द अक्षयनेच याचा खुलासा केला आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा चित्रपटाचे शूटींग संपले. तुमच्यासोबत चित्रपटाचा एक फोटो शेअर करतोय. केशव व जयाची ही युनिक लव्हस्टोरी २ जूनला चित्रपटगृहांमध्ये येणार आहे,’असे tweet अक्षयने केले आहे. }}}}‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला समर्थन करणार आहे. या चित्रपटातून स्वच्छता न राखणा-यांवर विनोदाच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. केशव हा ‘पे अॅण्ड युज टॉयलेट’ चालवत असतो. या टॉयलेटमध्ये येणाºया जया नामक मुलीच्या केशव प्रेमात पडतो आणि पुढे दोघांचे लग्न होते. या चित्रपटाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. अनुपम खेर यांची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. होशंगाबाद, भोपाळ आणि नर्मदा खोºयात या चित्रपटाचे शूटींग झाले. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ नामक चित्रपट अक्षयने स्वीकारावा, याचे आधी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. पण अक्षय हा बॉलिवूडचा प्रयोगशील अभिनेता आहे. स्वत:ला एकाच धाटणीच्या भूमिकेत बांधून न ठेवता अक्षयने कायम नव-नव्या भूमिका स्वीकारल्या आहेत. विशेष म्हणजे अक्षय या प्रत्येक भूमिकेत फिट बसला आहे.