Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘काबील’ मधील ‘यामी-हृतिक’ चा फर्स्ट लुक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 14:40 IST

 हृतिक रोशन हा सध्या दोन मुख्य चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ते म्हणजे,‘ काबील आणि मोहेंजोदडो’. मोहेंजोदडो चित्रपटातील काही गाणी आणि ...

 हृतिक रोशन हा सध्या दोन मुख्य चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ते म्हणजे,‘ काबील आणि मोहेंजोदडो’. मोहेंजोदडो चित्रपटातील काही गाणी आणि लुक्स आऊट करण्यात आले आहेत. ‘काबील’ चित्रपटात त्याने अंध व्यक्तीचे काम केले आहे. रिलीज झालेल्या फर्स्ट लुकमध्ये डुग्गू यामी गौतम सोबत काही वेळ घालवत असल्यासारखे दिसत आहे.ते दोघेही एकमेकांसोबत फारच क्यूट दिसत आहेत. दोघांमधील केमिस्ट्री ही फारच उत्तम आहे. त्यामुळेच ते दोघे एकमेकांसोबत खरंच खुप सुंदर दिसत आहेत. ‘काबील’ हा चित्रपट रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामा आहे.संजय गुप्ता दिग्दर्शित आणि राकेश रोशन निर्मित हा चित्रपट जानेवारी २०१७ मध्ये रिलीज होणार आहे. काबीलसोबत ‘रईस’चा संघर्ष होण्याची शक्यता आहे.