Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुणाल रॉय कपूरच्या 'मरुधर एक्सप्रेस'चा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 08:00 IST

अभिनेता व दिग्दर्शक कुणाल रॉय कपूरने 'नौटंकी साला' व 'देल्ही बेली' सारख्या सिनेमात काम केले आहे. तर अभिनेत्री तारा अलीशा बेरीने 'मस्तराम' चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये एन्ट्री केली आहे. तसेच तिने विक्रम भटच्या 'लव गेम्स'मध्ये काम केले आहे आणि इमरान हाश्मीसोबत 'राज रिबूट' चित्रपटात ती झळकली आहे.

ठळक मुद्दे'मरुधर एक्सप्रेस' फॅमिली कॉमेडी ड्रामावर आधारीत चित्रपट 'मरुधर एक्सप्रेस' २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता व दिग्दर्शक कुणाल रॉय कपूरने 'नौटंकी साला' व 'देल्ही बेली' सारख्या सिनेमात काम केले आहे. तर अभिनेत्री तारा अलीशा बेरीने 'मस्तराम' चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये एन्ट्री केली आहे. तसेच तिने विक्रम भटच्या 'लव गेम्स'मध्ये काम केले आहे आणि इमरान हाश्मीसोबत 'राज रिबूट' चित्रपटात ती झळकली आहे. आता पहिल्यांदाच कुणाल रॉय कपूर व तारा अलीशा बेरी रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ते दोघे 'मरुधर एक्सप्रेस' सिनेमात काम करत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा पोस्टर अभिनेता अर्जुन कपूरने ट्विटरवर शेअर केला आहे.

'मरुधर एक्सप्रेस' चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशमधील प्रेमकथेवर आधारीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अर्जुन कपूरने 'मरुधर एक्सप्रेस'चा पोस्टर शेअर करून ट्विट केले की. युपीमध्ये तुमचे स्वागत आहे. अफेअरच्या पुढे या आणि पाहा खरी प्रेम कथा. विशाल मिश्रा यांचा आगामी चित्रपट मरुधर एक्सप्रेसचा पहिला लूक सादर करतो आहे. यात मुख्य भूमिकेत कुणाल रॉय कपूर व तारा अलीशा बेरी दिसणार आहे. हा सिनेमा २६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

 

'मरुधर एक्सप्रेस' चित्रपटाचे नाव आधी 'हम दोनो होंगे कामयाब' हे शीर्षक ठरवण्यात आले होते. हा फॅमिली कॉमेडी ड्रामावर आधारीत चित्रपट आहे. दिग्दर्शक विशाल म्हणाले की, 'मी ऋषिकेश मुखर्जी यांचे खूप मोठे चाहते आहेत. 'मरुधर एक्सप्रेस' चित्रपट ऋषिकेश मुखर्जींच्या चित्रपट मेकिंगपासून प्रेरीत होऊन बनवला आहे. ''मरुधर एक्सप्रेस' चित्रपटात कुणाल रॉय कपूर व तारा अलीशा बेरी यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना भावेल का हे पाहणे कमालीचे ठरेल. 

टॅग्स :आदित्य रॉय कपूर