‘बादशाहो’तील पहिले गाणे ‘मेरे रश्के करम’चा फर्स्ट लूक आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 12:45 IST
‘इंतजार की घडियाँ बहुत जल्द खत्म होने वाली है...!’ होय, तुमची आमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ‘बादशाहो’ चित्रपटाचे पहिले ...
‘बादशाहो’तील पहिले गाणे ‘मेरे रश्के करम’चा फर्स्ट लूक आऊट!
‘इंतजार की घडियाँ बहुत जल्द खत्म होने वाली है...!’ होय, तुमची आमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ‘बादशाहो’ चित्रपटाचे पहिले गाणे लवकरच रिलीज होतेय. ‘शिवाय’च्या अपयशानंतर अजय देवगण पुन्हा एकदा धम्माल करण्यास सज्ज झाला आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणशिवाय इमरान हाश्मी, विद्युत जामवाल, इलियाना डिक्रूज, इशा गुप्ता आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. ‘बादशाहो’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता केवळ यातील पहिल्या गाण्याच्या रिलीजची प्रतीक्षा आहे. ‘मेरे रश्के कमर...’ असे या गाण्याचे शब्द आहेत. हे गाणे निश्चितपणे तुमच्या ‘फेवरेट प्ले लिस्ट’मध्ये असणारच. नुसरत फतेह अली खान यांनी हे ओरिजनल गाणे गायले आहे. त्याच्याच गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन ‘बादशाहो’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या गाण्याचे फर्स्ट लूक अजयने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहे. }}}}ALSO READ : ‘बादशाहो’मध्येही बघायला मिळणार अजय देवगणचा लिप लॉक सीन?‘बादशाहो’ची कथा १९७५ च्या आणीबाणी पार्श्वभूमीवर रेखाटली गेली आहे. याकाळात भारतातील सोने एका गावातून दुसºया गावात नेले जात असताना काही लोक हे सोने लुटण्याचा कट रचतात, अशी ही कथा आहे. एका मुलाखतीदरम्यान मिलन लुथरिया यांना ‘बादशाहो’च्या चित्रपटाची कथा कशी सुचली, यामागेही एक सुरस कथा आहे. १९९९ मध्ये राजस्थानात ‘कच्चे धागे’चे शूटींग सुुरू असताना मिलन यांना ही कथा ‘क्लिक’ झाली होती. या चित्रपटातही अजय देवगण लीड रोलमध्ये होता. म्हणजेच २० वर्षांपूर्वी ‘क्लिक’ झालेली कथा ‘बादशाहो’च्या निमित्ताने आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे. तोपर्यंत आपण ‘बादशाहो’चे ‘मेरे रश्के करम’ या गाण्याचा फर्स्ट लूक पाहणार आहोत. उद्या हे गाणे रिलीज होते आहे.