‘सुई धागा’चा फर्स्ट लूक रिलीज! पाहा, ममता-मौजीची जोडी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 11:32 IST
वरूण धवन आणि अनुष्का शर्मा या दोघांच्या ‘सुई धागा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आलाय. वरूणने आपल्या सोशल अकाऊंटवर ...
‘सुई धागा’चा फर्स्ट लूक रिलीज! पाहा, ममता-मौजीची जोडी!!
वरूण धवन आणि अनुष्का शर्मा या दोघांच्या ‘सुई धागा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आलाय. वरूणने आपल्या सोशल अकाऊंटवर हा लूक शेअर केला आहे. या फोटोत वरूण व अनुष्का अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसताहेत. अनुष्का फुलाफुलांची प्रिंट असलेल्या साडीत आहे. कपाळावर मोठी टिकली,भांगात कुंकू, हातात बांगड्या असा तिचा अंदाज आहे. तर वरूणने क्रिम कलरचा शर्ट आणि पँट कॅरी केला आहे. दोघेही ८० - ९० च्या दशकातील एखाद्या गावखेड्यात राहणाºया सर्वसामान्य जोडप्यासारखे भासत आहेत. वरूण व अनुष्काच्या या लूकने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली नसेल तर नवल. या चित्रपटात वरूण मौजी नामक तरूणाची भूमिका साकारणार आहे तर अनुष्का ममता नामक व्यक्तिरेखा जिवंत करणार आहे. ‘Exclusive -मौजी और ममता से मिलिए २८ सितम्बर को’ असे चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना वरूणने लिहिले आहे. यशराज फिल्म्स आणि मनीष शर्मा निर्मित हा चित्रपट शरत कटारिया दिग्दर्शित करत आहेत. कटारिया यांनी यांनीच ‘दम लगा हे हयशा’ दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.ALSO READ : ‘परी’चा आणखी एक टीजर! भल्याभल्यांना फुटेल घाम!!‘सुई धागा’ रिलीज व्हायला अद्याप बराच अवधी आहे. पण त्याआधीच वरूण व अनुष्का यांनी चित्रपटाचे प्रमोशन चालवले आहे. मध्यप्रदेशात याचे शूटींग सुरू असल्याचे कळतेय. वरूण धवन व अनुष्का शर्मा हे दोघे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. आता या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना किती भावते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. ‘सुई धागा’शिवाय अनुष्काचा ‘परी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्काची निर्मिती असलेला ‘परी’ एक हॉरर चित्रपट आहे.