FIRST LOOK : सलग पाच दिवस, पन्नास तास! ‘फन्ने खान’साठी अनिल कपूरने घेतली अशी मेहनत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 15:53 IST
‘फन्ने खान’ या चित्रपटाची सगळेच आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटात अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय लीड भूमिकेत दिसणार ...
FIRST LOOK : सलग पाच दिवस, पन्नास तास! ‘फन्ने खान’साठी अनिल कपूरने घेतली अशी मेहनत!!
‘फन्ने खान’ या चित्रपटाची सगळेच आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटात अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय लीड भूमिकेत दिसणार आहेत. ताजी बातमी म्हणजे, अनिलचा चित्रपटातील फर्स्ट लूक जारी झाला आहे. अनिल या चित्रपटात ‘सॉल्ट अॅण्ड पेपर’ लूकमध्ये दिसतोय. या लूकसाठी अनिल कपूर जे काही केले, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ALSO READ : अनिल कपूरच्या बायोपिकमध्ये उलगडणार या गोष्टीहोय, या लूकसाठी अनिलला बरीच मेहनत घ्यावी लागली. सलग पाच दिवस १०-१० दहा सलूनमध्ये घालवावे लागलेत. या दहा दिवसांत त्याच्या भूमिकेचा लूक ठरवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेलेत. अनेक तास खर्ची घातल्यानंतर अखेर त्याचा हा लूक फायनल झाला. चित्रपटातील अनिलचा लूक एकदम दमदार आहे.बॉलिवूडमधील सर्वाधिक फिटनेस फ्रीक म्हणून ओळखल्या जाणाºया अनिलने या चित्रपटासाठी वजनही कमी केले. यासाठी आपल्या डेली फिटनेस रूटीनमध्ये त्याला काही बदल करावे लागले. यानंतर भूमिकेसाठी लागणाºया शेपमध्ये यायला त्याला चार आठवडे लागले. तूर्तास बॉलिवूडच्या अनेक यंग अॅक्टर्सला लाजवणाºया अनिलच्या या लूकची बरीच प्रशंसा होतेयं. अर्जुनचा पुतण्या अर्जुन कपूरने काका अनिलच्या फर्स्ट लूकचा फोटो पोस्ट करत एक सुंदर कॅप्शन दिले आहे. ‘केसांचा रंग पांढरा असो वा काळा, हा तर तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे. लहान मुलांसारखे मन आणि टीनएजसारखा मेंदू असलेले अनिल कपूर एक यंग अॅक्टर आहेत,’असे टिष्ट्वट त्याने केले आहे.अतुल मांजरेकर दिग्दर्शित ‘फन्ने खान’ या चित्रपटात अनिल कपूर व ऐश्वर्या राय ही जोडी तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे. यापूर्वी ही जोडी ‘ताल’मध्ये एकत्र दिसली होती.