Join us

First look: आयुष्यमान खुराणाही दिसणार खाकी वर्दीत! ‘आर्टिकल 15’मध्ये लागली वर्णी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 11:19 IST

लवकरच आयुष्यमान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘बाला’ हा त्याचा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीय येतोय. आता आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये आयुष्यमानची वर्णी लागली आहे.

ठळक मुद्दे या चित्रपटात आयुष्यमान ईशा तलवारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. मनोज पहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, मोहम्मद जीशान अय्यूब यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

गतवर्षी आलेल्या ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ या चित्रपटांनी बॉक्सआॅफिसवर बक्कळ कमाईचं केली नाही तर अभिनेता आयुष्यमान खुराणा याचे फिल्मी करिअर एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याचमुळे सध्या सगळ्यांच्या तोंडी आयुष्यमानचे नाव आहे. आयुष्याच्या या वळणावर आयुष्यमानही बराच सावध झाला आहे. अगदी निरखून पारखून चित्रपटांची निवड तो करू लागला आहे. भूमिका कमी लांबीची असली तरी चालेल; पण चित्रपटाची कथा दमदार असायला हवी, याकडे त्याचा कल आहे. ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ या चित्रपटातही हेच पाहायला मिळाले. या दोन्ही चित्रपटात हिरोची भूमिका फार मोठी नव्हती. पण दमदार पटकथेमुळे हिरोने बाजी मारली. लवकरच आयुष्यमान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘बाला’ हा त्याचा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीय येतोय. आता आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये आयुष्यमानची वर्णी लागली आहे.

 

होय, लवकरच अनुभव सिन्हाच्या चित्रपटात आयुष्यमान दिसणार आहे. ‘आर्टिकल 15’ असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटात आयुष्यमान पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणाही झालीय. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित केले. या चित्रपटात आयुष्यमान ईशा तलवारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. मनोज पहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, मोहम्मद जीशान अय्यूब यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. लखनौमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणा