Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला सोडून हिच्यासोबत 10 वर्षे लिव्हनमध्ये राहिले होते फिरोज खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 17:25 IST

बॉलिवूडमध्ये फिरोज खान 70च्या दशकातले सगळ्यात स्टायलिश अभिनेत्यांपैकी एक आहेत. फिरोज खान यांना बॉलिवूडमधला पहिला आणि शेवटचा काऊब्वॉय म्हणून ...

बॉलिवूडमध्ये फिरोज खान 70च्या दशकातले सगळ्यात स्टायलिश अभिनेत्यांपैकी एक आहेत. फिरोज खान यांना बॉलिवूडमधला पहिला आणि शेवटचा काऊब्वॉय म्हणून सुद्धा ओळखले जाते. आज फिरोज खान यांची जयंती आहे.फिरोज खाना यांनी आपली रॉयल्टी कधी सोडली नाही.  त्यांचे आयुष्य कोणत्या राजकुमाराच्या आयुष्यापेक्षा कमी नव्हते. खोटे सिक्के, काला सोना, धर्मात्मा, कुर्बानी, जांबाज, दयावान आणि यलगार यासारखे हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. फिरोज खान त्यांच्या पर्सनल आयुष्याला घेऊन नेहमीच चर्चेत राहिले.  फिरोज खान यांचे पहिले लग्न हरफनमौला यांच्यासोबत झाले होते. रात्रीच्या पार्ट्यांमध्ये ते जास्त रमायचे. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसोबत पार्टी करणे त्यांच्यासोबत सामान्य गोष्ट झाली होती. अशाच एका पार्टीत त्यांची ओळख सुंदरी बरोबर झाली होती. पहिल्याच नजरेत सुंदरी फिरोज यांच्या मनात घर करुन गेली. मीडिया रिपोर्टनुसार सुंदरीचे आधीच लग्न झाले होते आणि तिला सोनिया नावाची मुलगीसुद्धा होती. मात्र ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे कि फिरोज आणि सुंदरने लग्न केले होते. 1974 साली फरदीन खानचा जन्म झाला.       ALSO RAED : बॉलिवूडमधील या दोन घनिष्ठ मित्रांचे एकाच तारखेला झाले होते निधनलग्नानंतर काही वर्ष सगळे काही चांगले चालले होते. त्यानंतर सुंदरीला एक दिवशी कळले की फिरोह खान आणखीन कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडले आहेत. ती मुलगी दुसरी, तिसरी कोणी नसून प्रसिद्ध धनराजगिर कुटुंबाची मुलगी ज्योतिका धनराजगिर होती. ज्योतिक हवाई सुंदरी होती.  यानंतर फिरोज आणि सुंदरी यांच्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली.  एकाच छताच्या खाली दोघे वेगवेगळे राहायला लागले. ज्योतिका आणि फिरोज जवळपास 10 वर्षे एक्स्ट्रा मॅरिटियल ऑफर होते. ज्योतिकाला फिरोज यांच्यासोबत लग्न करायचे होते मात्र फिरोज खान यांनी नकार दिला. यामुळे ज्योतिका त्यांच्यापासून वेगळी राहायला लागली. फिरोज यांच्यापासून वेगळी झाल्यावर ती लंडनला शिफ्ट झाली. तिकडे तिने बिझनेस सुरु केला होता. यानंतर काही वर्षांनी ती फिरोज खान यांच्याकडे परत आली.