Join us

"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:00 IST

सोनू निगमने भर कॉन्सर्टमध्ये पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करुन असं काय केलं की गायकाविरोधात FIR दाखल करण्यात आला, जाणून घ्या सविस्तर (sonu nigam)

गायक सोनू निगम (sonu nigam) हा कायमच स्पष्ट आणि परखड वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सोनू निगम सध्या जगभरात त्याच्या म्यूझिक कॉन्सर्टचे शो करत आहे. पण एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगमने केलेल्या वक्तव्याने त्याच्याविरुद्ध FIR नोंदवण्यात आला आहे. सोनू निगमने कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने कन्नड गाण्याची फर्माइश केली असता त्याच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने, सोनू निगमवर FIR दाखल करण्यात आला आहे. काय घडलं, जाणून घ्या.

सोनू निगमवर FIR दाखल

झालं असं की, एका कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याने सोनू निगमला कन्नड गाणं गाण्याची विनंती केली होती. परंतु ही मागणी सोनू निगमने वेगळ्या भावनेत घेतली आणि त्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली. सोनू निगम सर्वांसमोर म्हणाला की, "या चाहत्याच्या जन्माआधीपासून मी कन्नड गाणी गातोय. याच कारणाने पहलगाममध्ये हल्ला झाला. अशाच वागणुकीमुळे तिथे हल्ला झाला", अशाप्रकारे सोनू निगमने चाहत्याने जी मागणी केली होती त्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने काही संघटनांनी सोनू निगमच्या असंवेदनशील वागण्यावर बोट ठेवलं आहे.

चाहत्याच्या मागणीची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने बंगळुरु येथील अनेक कन्नड संघटनांनी अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये सोनू निगमविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ (१), ३५२ (२) आणि ३५३ अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक स्थळी अपमान आणि शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्याने, सोनू निगमविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

सोनू निगम काय म्हणाला

या वादानंतर सोनू निगमने त्याचं स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला की,  "कोणत्याही भाषा आणि संस्कृतीचा अपमान करणं हा माझा उद्देश नव्हता. कन्नड संगीत आणि कर्नाटक राज्याशी माझं जुनं नातं आहे. मी जेव्हा कर्नाटकमध्ये येतो तेव्हा मला घरी आल्यासारखं वाटतं. परदेशीही जेव्हा माझा कार्यक्रम असतो तेव्हा कमीत कमी एक कन्नड गाणं मी आवर्जून गातो", अशाप्रकारे सोनू निगमने स्पष्टीकरण दिलं आहे.

टॅग्स :सोनू निगमपहलगाम दहशतवादी हल्लादहशतवादी हल्लादहशतवादसंगीतकर्नाटक