Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावती’संदर्भात योग्य माहिती घ्या, जावेद अख्तर यांच्या ट्विटवर ट्रोलिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 18:34 IST

पद्मावती चित्रपटाच्या शूटिंगप्रसंगी संजय लीला भन्साळी यांना मारहाण झाल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या ट्विटवर जोरदार ट्रोलिंग झाले. खिलजी ...

पद्मावती चित्रपटाच्या शूटिंगप्रसंगी संजय लीला भन्साळी यांना मारहाण झाल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या ट्विटवर जोरदार ट्रोलिंग झाले. खिलजी साम्राज्य आणि राणी पद्मिनी यांच्या इतिहासाबद्दल योग्य माहिती घ्या असे जावेद अख्तर यांनी ट्विट केले होते, त्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.जावेद अख्तर यांनी ट्विट करताना म्हटले की, खिलजी हे मुघल नव्हते. मुघल साम्राज्यापूर्वी २०० वर्षे ते अगोदर आले होते. पद्मिनी आणि अल्लाउद्दीन यांच्याकडे तथ्य म्हणून नव्हे तर कल्पना म्हणून पाहा. आपल्या दुसºया ट्विटमध्ये ते म्हणात, पद्मावत हे अकबराच्या कालखंडापूर्वी लिहिले आहे. मलिक मोहम्मद जैसी यांनी मुघलांनी सत्ता काबीज करण्यापूर्वी हे लिहिले आहे.’ जावेद अख्तर यांच्या या ट्विटवर अनेकांनी समर्थनार्थ आणि विरोधात लिहिले आहे. हिंदुविरोधी, कडवे मुस्लीमधार्जिणे, अज्ञानी अशा स्वरुपाचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. हल्लेखोरांना समर्थन देऊ नका असेही यात म्हटले आहे. राजपूत करणी सेनेच्यावतीने राणी पद्मिनी यांचा चुकीचा इतिहास चित्रपटात दाखविण्यात येत असल्याच्या कारणावरून संजय लीला भन्साळी यांना मारहाण करण्यात आली होती. यानंतर बॉलिवूडमधील अनेक जण भन्साळींच्या समर्थनार्थ पुढे आले. सुशांत सिंग राजपूत याने आपले आडनाव काढून टाकले. अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अभिनेते ऋषी कपूर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला होता. अनेकांनी राजस्थानमध्ये यापुढे शूटिंग करण्यात येऊ नये अशी मागणीही केली.संजय लीला भन्साळी यांनी पद्मिनीच्या पात्राबाबत कोणतीही चुकीची माहिती दाखविण्यात येणार नाही, असे आश्वासन राजपूत करणी सेनेला दिले आहे. या चित्रपटात कोणत्याही काल्पनिक स्वरुपात पद्मिनी आणि अल्लाउद्दीन यांच्यात प्रेमप्रकरण दाखविण्यात येणार नाही, असेही यात दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे.