Finally! या तारेखाला सुरु होणार जान्हवी कपूरच्या चित्रपटाची शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:11 IST
बॉलिवूड कपल श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेचा विषय असते. जान्हवी ...
Finally! या तारेखाला सुरु होणार जान्हवी कपूरच्या चित्रपटाची शूटिंग
बॉलिवूड कपल श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेचा विषय असते. जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच फेमस झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन रोज नवी चर्चा असतेच. मीडिया रिपोर्टनुसार तिच्या चित्रपटाच्या शूटिंगची डेट कन्फर्म झाली आहे. चित्रपटाची शूटिंग राजस्थानमधील उदयपूर येथे केली जाणार आहे. जान्हवी नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार आहे. सैराटच्या रिमेकला शशांक खेतान दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपटात ईशांत एका दलित मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर जान्हवी उच्चवर्णीय म्हणजेच ब्राह्मण समाजातील मुलीच्या भूमिकेत असेल. दोघांमध्ये प्रेम दाखविण्यात येणार असून, पुढे सैराटप्रमाणेच त्याचा क्लायमॅक्स असेल. समाजातील जातीय बंधने दाखविण्यासाठी उदयपूरमधील ग्रामीण भागाची निवड करण्यात आली आहे. ईशांत आणि जान्हवीच्या प्रेमकथेतील काही भाग आणि काही गाणे उदयपूरमध्येच शूट केले जाणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला 1 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार आहे. याचित्रपटात जान्हवीसोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर दिसणार आहे. रिपोर्टनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी जून किंवा जुलैमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स जनरेशन सध्या डेब्यू करते आहे यात जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जान्हवी कपूर ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलमध्ये दिसणार असल्याचे समजते. यात ती श्रीदेवीसोबत काम करताना दिसेल. या सीक्वलमध्ये दोन जोड्या असतील. मिस्टर इंडिया’चा सीक्वल रवी उद्धावर डायरेक्ट करणार आहे. पहिली जोडी कॉमन जोडी. अर्थातच श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची. तर दुसºया जोडीत यंग स्टार्स दिसतील. यात जान्हवी कपूर हिरोईनची भूमिका साकारताना दिसेल. निर्माते बोनी कपूर यांनीही या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची इच्छा बोलून दाखवली होती.सध्या ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलवर बोलणे घाईचे ठरेल. सध्या केवळ सीक्वलवर चर्चा झालीय. काहीही फायनल झालेले नाही, असे श्रीदेवी म्हणाली होती.