Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर झाला खुलासा! लग्नाच्या ४ वर्षांनंतर हार्दिक-नताशाचा का झाला घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:38 IST

Natasha Stankovic And Hardik Pandya : नताशा स्टॅन्कोविक आणि हार्दिक पांड्याने काही काळापूर्वी घटस्फोटाची घोषणा केली होती. एका रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या विभक्त होण्याचे खरे कारण समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी अलिकडेच घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने चाहत्यांनाही धक्का बसला. तेव्हापासून या जोडप्याचे ब्रेकअप का झाले हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर आता नताशा आणि हार्दिकच्या विभक्त होण्याचे कारण समोर आले आहे.

टाइम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये नताशा आणि हार्दिकच्या विभक्त होण्याचे कारण समोर आले आहे. रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले की, “हार्दिक नताशाच्या बाबतीत खूप नकली वागत होता आणि तो स्वतःमध्येच राहत होता. नताशाला ते अधिक सहन होत नव्हते. त्यांच्यात माणूस म्हणून खूप फरक आहे हे अभिनेत्रीच्या लक्षात आले. नताशानेही तिचं व्यक्तिमत्त्व हार्दिकच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. ही कधीही न संपणारी प्रक्रिया होती, त्यामुळे काही काळानंतर ती थकली. नताशाला गती राखता आली नाही आणि मग तिने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

हा अत्यंत वेदनादायक निर्णय होता

एबीपीच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी सांगितले की, “नताशाने घटस्फोटाच्या निर्णयावर पुनर्विचार केला असला तरी हार्दिकमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे अभिनेत्रीने तिच्या विभक्त होण्याच्या निर्णयाला पुष्टी दिली. नताशासाठी हा अत्यंत वेदनादायक निर्णय होता पण तो एका दिवसात किंवा आठवड्यात घेतला गेला नाही. ही एक मंद पण हळूहळू जखम होती जी तिला वेदना देत राहिली. मात्र या दाव्यात किती सत्य आहे याची पुष्टी करत नाही कारण नताशा किंवा हार्दिक दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याच्या कारणाबद्दल कधीही बोललेले नाही.

लग्नाच्या चार वर्षानंतर हार्दिक-नताशा वेगळे झाले आहेतनताशा स्टॅन्कोविक आणि हार्दिक पांड्या यांचे मे २०२० मध्ये लग्न झाले. या जोडप्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. त्यांना एक मुलगा अगस्त्य देखील आहे. जुलै २०२४ मध्ये, जोडप्याने एक संयुक्त निवेदन जारी करून त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या निवेदनात लिहिले की, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास घेत आम्ही एक कुटुंब म्हणून वाटचाल केली. मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अगस्त्य आहे, जो नेहमी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची गोपनीयता तुम्ही समजून घ्याल.

नताशा मुलासोबत सर्बियाला झाली शिफ्टविभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅन्कोविच तिच्या चार वर्षांच्या मुलगा अगस्तसह तिच्या मूळ गावी सर्बियाला शिफ्ट झाली, तर हार्दिक अमेरिकन गायिका जस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या अफवा आहेत.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच