Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ अखेर प्रियांका चोप्राला मागावी लागली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 16:41 IST

अखेर प्रियांका चोप्राला माफी मागावी लागली. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रियांकाला अखेर आपली चूक उमगली आणि मग या संपूर्ण ...

अखेर प्रियांका चोप्राला माफी मागावी लागली. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रियांकाला अखेर आपली चूक उमगली आणि मग या संपूर्ण प्रकरणावर माफी मागणेच तिने बेहत्तर समजले. एका वादग्रस्त विधानामुळे प्रियांका आज चर्चेत आली होती. केवळ चर्चेत नाही तर या वादग्रस्त विधानामुळे तिने लोकांचा संताप ओढवून घेतला होता. होय, अलीकडे प्रियांका टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. याठिकाणी प्रियांकाने प्रोड्यूस केलेल्या ‘पहुना’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. प्रियांकाच्या चित्रपटाला स्टँडिंग ओविएशन मिळाले. पण  प्रियांकाची मुलाखत झाली अन् या मुलाखतीत प्रियांका भलतेच काही बोलून गेली. सिक्कीम हे भारताच्या ईशान्य भागातील एक लहानसे राज्य आहे. येथे कधीच चित्रपटसृष्टी पोहोचली नाही. या राज्यातील कुणीही कधीही चित्रपट बनवलेला नाही. ‘पहुना’ हा या राज्याशी संबंधित चित्रपट आहे. कारण सिक्कीम हे दहशतवादाने पोळलेले राज्य आहे, असे प्रियांका म्हणाली. मग काय तिच्या या विधानानंतर सोशल साईटवर लोकांनी प्रियांकाला चांगलेच घेरले. लोकांनी तिच्या या विधानाची तीव्र शब्दांत निंदा केली. ‘मी प्रियांकाच्या या बोलण्याची निंदा करतो. सिक्कीम भारताचे सर्वाधिक शांतीप्रिय राज्य आहे. तुला लाज वाटायला हवी’, असे एका युजरने लिहिले. अनेक युजर्सनी प्रियांकाच्या तोकड्या माहितीवर बोट ठेवले. ‘प्रियांका, स्वत:च्या माहितीत भर घाल अन् सिक्कीमच्या लोकांची माफी माग,’असे एकाने लिहिले. अन्य एका युजर्सने प्रियांकाला थेटपणे सिक्कीम कुठे आहे, हे तरी तुला ठाऊक आहे का? असा उपरोधिक प्रश्न विचारून टाकला. ALSO READ : प्रियांका चोप्राला आजही होतो ‘या’ एकाच गोष्टीचा पश्चाताप!या ट्रोलिंगनंतर प्रियांकाला माफी मागावी लागली. तिने सिक्कीम सरकारची लेखी स्वरूपात माफी मागितली. यापश्चात सिक्कीमच्या पर्यटन मंत्र्यांनी प्रियांकाने याबद्दल दिलगीरी व्यक्त केल्याचे सांगितले. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांच्यासोबत माझे फोनवरून बोलणे झाले. प्रियांका आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीर आहे, असे मधू यांनी मला सांगितल्याचे या पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.