Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अखेर प्रभासला मिळाली हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 09:42 IST

प्रभासचा आगामी सिनेमा ‘साहो’बद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ‘बाहुबली2’नंतर प्रभास या चित्रपटातून एका आगळ्या वेगळ्या रूपात आपल्यासमोर येणार आहे. ...

प्रभासचा आगामी सिनेमा ‘साहो’बद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ‘बाहुबली2’नंतर प्रभास या चित्रपटातून एका आगळ्या वेगळ्या रूपात आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात प्रभासची हिरोईन कोण बनणार? यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. सर्वप्रथम प्रभाससोबत अनुष्का शेट्टी दिसणार, अशी चर्चा रंगली. पण वाढलेल्या वजनामुळे अनुष्काचा या पत्ता कट झाला.  ‘बाहुबली-२’च्या अफाट यशानंतर प्रेक्षकांना अनुष्काकडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे स्वत:चे वाढलेले वजन कमी करायचे काय? याबाबतचा निर्णय घेणे अनुष्काला म्हणे अवघड जात होते.  ‘देवसेना’ लूक प्रेक्षकांच्या मनात कायम असावा, असा यामागचा तिचा विचार होता.   याच कारणामुळे अनुष्काने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. यानंतर पूजा हेगडे हिचेही नाव चर्चेत आले. पण ती सुद्धा चर्चेअंती या शर्यतीतून बाद झाली. यानंतर श्रद्धा कपूर हिच्या नावाची जोरदार चर्चा रंगली. पण आता आमच्याकडे फायनल बातमी आहे. होय, प्रभासला हिरोईन मिळालीय. कोण? अहो, श्रद्धा कपूर. होय, ‘साहो’साठी अखेर श्रद्धाचेच नाव फायनल झाल्याचे कळतेय. खुद्द ‘साहो’च्या मेकर्सनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रद्धा कपूर आमच्या भूमिकेच्या चौकटीत अगदी फिट बसते. त्यामुळे या चित्रपटासाठी तिला साईन करण्यात आले आहे. आम्हाला आनंद आहे की, ती आमच्यासोबत जुळली, असे ‘साहो’च्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.तूर्तास श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट  ‘हसीना पारकर’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपटा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्यावर आधारित आहे.यात श्रद्धा हसीना पारकरची भूमिका साकारते आहे. ‘साहो’ हा स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. सध्या रामोजी फिल्म सिटीत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. यासाठी स्वातंत्र्यापूवीर्चा सेट उभारण्यात आला आहे.