Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ अखेर कृतिका कामराला लागली बॉलिवूडची लॉटरी! ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 14:24 IST

अखेर कृतिका कामराला बॉलिवूडची लॉटरी लागलीच. १२ वर्षांच्या टेलिव्हिजनवरील दीर्घ करिअरनंतर कृतिका आत्ताकुठे बॉलिवूड डेब्यू करणार आहे. होय, कृतिकाच्या ...

अखेर कृतिका कामराला बॉलिवूडची लॉटरी लागलीच. १२ वर्षांच्या टेलिव्हिजनवरील दीर्घ करिअरनंतर कृतिका आत्ताकुठे बॉलिवूड डेब्यू करणार आहे. होय, कृतिकाच्या हाती एक चित्रपट लागलाय. या चित्रपटात ती अभिनेता जॅकी भगनानीच्या अपोझिट दिसणार आहे.हा नवा चित्रपट ‘पेल्ली चूपुलु’या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. या तेलगू चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रितु वर्मा हे लीड रोलमध्ये होते. राष्ट्रीय पुरस्कार नावावर असलेल्या या चित्रपटाचाच हिंदी रिमेक बनतोय आणि कृतिका व जॅकी त्यात लीड रोलमध्ये दिसणार आहेत. ‘फिल्मीस्तान’चा दिग्दर्शक नितीन कक्कर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात कृतिका व जॅकी यांच्याशिवाय प्रतिक बब्बर आणि गुजराती अभिनेता प्रतिक गांधी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.कृतिका कामरा टेलिव्हिजनचा एक लोकप्रीय चेहरा आहे. ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतील कृतिकाने साकारलेली आरोही आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’मधील डॉ. निधी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. ‘यहां के हम सिकंदर’ ही कृतिकाची पहिली मालिका. पण   ‘कितनी मोहब्बत है’ या बॉलाजी टेलिफिल्म्सच्या मालिकेने कृतिकाला खरी लोकप्रीयता मिळाली. यानंतर ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेने कृतिका घराघरात पोहोचली. मालिकांशिवाय अनेक शॉर्ट्स फिल्म्समध्येही ती दिसली आहे.  इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कृतिका व करण कुंद्रा यांच्या रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली होती. हे दोघे लग्न करणार, असेही बोलले गेले होते. पण कालांतराने हे नाते तुटले. यानंतर कृतिकाचे नाव सिद्धार्थ बिुजुपुरियासोबत जोडले गेले. हे रिलेशनशिप तिने कबुलही केले. पण दीड वर्षांनंतर हे नातेही तुटले.ALSO READ: कृतिकाचा कामराचे व्हॅकेशन PHOTOS पाहिलेत का तुम्ही?बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कृतिकाचा बºयाच वर्षांपासून संघर्ष सुरु होतो. मला टीव्ही अभिनेत्री हा ठप्पा घेऊन जगायचे नाही. पण म्हणून बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मी उताविळ नाही.चांगली स्टोरी व भूमिका मिळाली तरच मी सिनेमा स्वीकारेल, असे कृतिका अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती.