अखेर अनुराग कश्यपने मान्य केले स्वत:पेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेन्डसोबतचे नाते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:05 IST
कल्की कोच्लिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनुराग कश्यप स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत डेट करतोय. दीर्घकाळापासून अनुरागच्या या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण ...
अखेर अनुराग कश्यपने मान्य केले स्वत:पेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेन्डसोबतचे नाते!
कल्की कोच्लिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनुराग कश्यप स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत डेट करतोय. दीर्घकाळापासून अनुरागच्या या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण अनुराग आत्तापर्यंत यावर मौन बाळगून होता. पण अखेर अनुरागने मौन सोडलेय. पहिल्यांदा अनुराग आपल्या रिलेशनशिपवर बिनधास्त बोलला आहे. होय, अनुरागने पहिल्यांदा त्याच्या व शुभ्रा शेट्टीच्या रिलेशनशिपची गोष्ट कबुल केली आहे.‘फिल्मफेअर’ला दिलेल्या ताज्या मुलाखतीत अनुराग यावर बोलला. सर्वांना प्रेम करण्याचा अधिकार आहे. मी प्रेमाचा आदर करतो,करेल. मग मी नव्वदी पार केली असेल तरी चालेल. भूतकाळातील तुटलेल्या नात्यांच्या आठवणी घेऊन मी वेळ वाया घालवू इच्छित नाही. बॉलिवूडमध्ये हृदयभंगावर अनेक गाणी बनली आहेत. पण मी घुंगरांसारखा वाजत राहिलो आहे. पुन्हा प्रेमात पडण्यावर माझा विश्वास आहे, असे अनुराग म्हणाला. ALSO READ : १७ वर्षांची झाली आलिया; तिच्यापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठी आहे डॅडी अनुराग कश्यपची गर्लफ्रेंड!अनुरागचे वय सध्या ४५ वर्षांचे आहे तर त्याची गर्लफ्रेन्ड शुभ्रा शेट्टी ही केवळ २३ वर्षांची आहे. डिसेंबर २०१५ मध्येच अनुराग व शुभ्राच्या अफेअरच्या चर्चा कानावर आल्या होत्या. दोघेही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना जोर चढला होता. डिझाईनर मसाबा हिच्या संगीत सेरेमनीत स्वत: अनुरागने शु्रभाचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून अनुराग व शुभ्रा एकमेकांना डेट करत असल्याचे मानले गेले होते. अर्थात अफेअरच्या या बातम्यांनी अनुराग चांगलाच संतापला होता. केवळ संतापलाच नाही तर त्याने या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. आपले म्हणणे खरे करण्यासाठी अनुरागने एका फोटोचा आधार घेतला होता. या फोटोत आमच्यासोबत अनेक मित्र आहेत. पण मीडिया केवळ माझ्यावर व शुभ्रावर फोकस करून वेगळ्याच कहाण्या गढत असल्याचे त्याने म्हटले होते. पण आता कदाचित पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर कदाचित अनुरागला शुभ्रासोबतचे नाते मान्य करावे लागलेय.शुभ्राने मुंबईच्या सेंट जेवियर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. तूर्तास ती अनुरागच्या ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन कंपनीत काम करतेय.