Join us

निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने केली आत्महत्या, घरातच घेतले स्वतःला जाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:16 IST

त्या दोघींचेही निधन झाले असून पोलिस चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देसंतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी अंधेरी येथील डी.एन. नगर परिसरातील त्यांच्या घरी सोमवारी दुपारी आत्महत्या केली.

फरार, रोमी द हिरो, आज की औरत यांसारख्या छोट्या बजेटच्या चित्रपटांची निर्मिती केलेले निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने राहात्या घरी स्वतःला जाळून घेतले. 

संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी अंधेरी येथील डी.एन. नगर परिसरातील त्यांच्या घरी सोमवारी दुपारी आत्महत्या केली. घरातून आगीचे लोळ येत असल्याने शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामकचे जवान येताच त्यांनी दोघींना बाहेर काढले आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करताच अस्मिता यांचे निधन झाले तर सृष्टी 70 टक्के भाजलेली असलेल्याने ऐरोली नॅशनल बर्नमध्ये तिला उपचारासाठी पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचे मंगळवारी निधन झाले. 

अस्मिता गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या तर सृष्टी आईच्या आजारामुळे नेहमीच टेन्शमध्ये असायची. याच कारणाने त्या दोघींनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. डी.एन. नगर पोलिस चौकीत अस्मिता आणि सृष्टी यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :बॉलिवूड