Join us

आंधळ्यांच्या आयुष्यावर मंसुरी बनवणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 17:32 IST

आंधळ्यांच्या आयुष्यावर आतापर्यंत बॉलिवुडमध्ये अनेक चित्रपट बनवण्यात आले आहे. मोहरा, आँखे यांसारख्या चित्रपटांमध्ये आंधळ्यांना वाईट काम करताना दाखवण्यात आले आहे. ...

आंधळ्यांच्या आयुष्यावर आतापर्यंत बॉलिवुडमध्ये अनेक चित्रपट बनवण्यात आले आहे. मोहरा, आँखे यांसारख्या चित्रपटांमध्ये आंधळ्यांना वाईट काम करताना दाखवण्यात आले आहे. आंधळ्यांच्या चांगल्या गोष्टी समाजासमोर आणण्याची गरज आहे असे डॉ. समीर मंसुरी यांचे म्हणणे आहे. आंधळ्यांच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी लोकांसमोर आणण्याचा त्यांनी विचार केला आहे. समीर यांना जन्मतः दिसत नाही. त्यामुळे आंधळ्यांचे दुःख, त्यांच्या समस्या काय असतात याची त्यांना चांगलीच कल्पना आहे आणि त्यामुळे त्यांनी आंधळ्यांवर चित्रपट आणण्याचे ठरवले आहे. सध्या ते चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे. या चित्रपटामुळे आंधळ्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे. मंसुरी यांना त्यांच्या कामासाठी बॉलिवुडमधून नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे. ऐश्वर्या रॉय, वरुण धवन यांनी नेहमीच त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे.