Join us

"याची पॅन्ट काढा आणि...", भर रस्त्यात महेश भट यांच्यासोबत घडलेली विचित्र घटना, म्हणाले-"चार मुलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:18 IST

भर रस्त्यात अचानक चार मुलांनी घेरलं अन्... ; महेश भट यांच्यासोबत घडलेली विचित्र घटना! म्हणाले...

Mahesh Bhatt: हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बोल्ड लिखाण व आपल्या विशिष्ट दिग्दर्शकीय कौशल्यामुळे ओळखल्या जाणार्‍या लेखक, दिग्दर्शक, निर्माता व पटकथाकार म्हणजे महेश भट. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात 'अर्थ', 'सारांश', 'जानम', 'नाम', 'सडक', जख्म यासारखे अर्थपूर्ण चित्रपट या चित्रसृष्टीला दिले आहेत. सध्या ते निर्माता आणि लेखक म्हणून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. दरम्यान, महेश भट एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. नुकतीच महेश भट यांनी लेक पूजा भटच्या एका पॉडकास्टमध्ये  हजेरी लावली. यादरम्यान, महेश भट यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे. 

महेश भट यांचे वडील गुजराती ब्राह्मण नानाभाई भट आणि आई शिया मुस्लिम शिरीन मोहम्मद अली यांचे ते अपत्य. त्यांचे लहान बंधू मुकेश भट हे देखील चित्रपट निर्माता आहेत. आई मुस्लिम धर्मीय असल्यामुळे त्यांना लहानपणी काही मुलांनी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. पूजा भटच्या पॉडकास्टमध्ये महेश भट यांनी खुलासा केला आहे की, लहानपणी  मुलांनी त्यांच्यासोबत वाईट कृत्य केलं होतं आणि आई-बहिणीवरुन वाईट बोलत होते. त्यांच्यासोबत घडलेल्या विचित्र घटनेविषयी बोलताना महेश भट म्हणाले, " अचानक चार मुलांनी मला घेरलं. त्यांनी मला धरलं आणि भींतीवर आपटलं. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो." त्यानंतर  महेश भट यांनी सांगितलं ते त्या मुलांजवळ हात जोडून विनंती करत होते पण त्यांनी त्रास देणं थांबवलं नाही.

त्यानंतर महेश भट यांनी पुढे त्या घटनेविषयी सांगितलं की, "ती मुलं म्हणाली, याची पॅन्ट उतरवा! त्याचं ते बोलणं ऐकून मी घाबरलो आणि म्हणालो, 'तुम्ही असं का करताय?' तर ते म्हणाले, आम्हाला तू आमच्यातलाच आहेस की नाही ते पाहायचं आहे. कारण,तुझी आई वेगळ्या धर्मातील आहे. मग तुझं नाव महेश कसं.त्यामुळे मला खूप वाईट वाटलं आणि मी ढसाढसा रडायला लागलो.मी त्यांना धमकी दिली की तुम्ही जर मला सोडलं नाहीतर मी माझ्या बाबांकडे तुमची तक्रार करेन. पण, ते उलट उत्तर देत म्हणाले तुझे बाबा कुठे आहेत ते सांग."

मी वडिलांविषयी सांगितलं आणि...

"त्यानंतर मी त्या मुलांना खरं काय ते सांगितलं. माझे वडील आमच्यासोबत राहत नाही. ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर राहतात आणि मी माझ्यासोबत अंधेरीत राहतो. त्यानंतर सगळे गप्प झाले आणि त्यांनी मला सोडलं. "असा खुलासा महेश भट यांनी केला. 'या घटनेनंतर मी घरी आलो मात्र, त्या वेदना अजूनही त्यांच्या मनात कायम आहेत', असं त्यांनी सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahesh Bhatt recounts childhood trauma: Harassment, religious discrimination, and fear.

Web Summary : Mahesh Bhatt shared a disturbing childhood incident where he faced harassment and religious discrimination. He was surrounded by boys who threatened him, demanding to verify his religious identity due to his mother's faith. The incident left a lasting impact.
टॅग्स :महेश भटबॉलिवूडसेलिब्रिटी