राजश्री फिल्मचे संस्थापक आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडिल होत. त्यांच्या मागे पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे.ट्रेड अॅनालिस्ट कोमल नहता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर राजकुमार यांच्या निधनाची बातमी शेअर केली. काहीच मिनिटांपूर्वी राजकुमार बडजात्या यांचे निधन झालेत. मला विश्वास बसत नाहीये. आठवडाभरापूर्वी त्यांच्या प्रभादेवी कार्यालयात मी त्यांना भेटलो होतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 11:00 IST
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले.
बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन
ठळक मुद्देराजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली.