फिल्लोरीचे साहिबा गाणे प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 17:41 IST
फिल्लोरी चित्रपटाचे साहिबा हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
फिल्लोरीचे साहिबा गाणे प्रदर्शित
सध्या फिल्लोरी या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असल्याचे पाहायला मिळाले. तसेच यानंतर या चित्रपटाच्या पोस्टरचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. आता यापाठोपाठ या चित्रपटाचे साहिबा हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि दिलजित दोसांज हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता साहेबा हे गाणे दिलजीतनेच गायले असावे असा अंदाज सर्वजण बांधत असताना, हे गाणे रुमी या गायकाने गायले आहे. गाण्यात जुना काळ दाखवताना त्यात प्रेमही तेवढेच दाखवण्यात आले आहे. हे गाणे दिलजीतने गायला हवे असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. पण तसे झालेले दिसत नाही.या गाण्याला शाश्वत सचदेवने संगीत दिले असून अनवित्ता दत्तने हे गाणे लिहिले आहे. एकमेकांवर नित्सिम प्रेम करणारी प्रेमीयुगुलं जेव्हा वेगळी होतात तेव्हा त्यांच्यासोबत काय होते ते या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. अनुष्का आणि दिलजीतवर चित्रित झालेले हे गाणे प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. हे गाणे प्रदर्शित होण्याआधीपासूनच दिलजीत आणि अनुष्काने या गाण्याबद्दल उत्सुकता वाढवली होती. ट्विटर चॅटवर दोघांनीही या गाण्याचे काही बोल ट्विट केले होते. या गाण्याआधी फिल्लौरीची व्हॉट्सअॅप आणि दम दम ही दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. आता या गाण्यांप्रमाणेच साहेबा गाणे हिट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.