रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका चाहतीने हा चित्रपट पाहिला आहे. विशेष म्हणजे, या चाहतीला 'धुरंधर २' uncensored व्हर्जन पाहता आलं. त्यामुळे भारतात प्रदर्शित झालेल्या चित्रपटापेक्षा ६ मिनिटांचा जास्त भाग पाहायला या फॅनला पाहता आला, अशी चर्चा आहे.
६ मिनिटांच्या अतिरिक्त सीनमध्ये काय? त्या चाहतीच्या मते, कॅलिफोर्नियातील एका थिएटरमध्ये दाखवण्यात आलेल्या धुरंधर २' च्या uncensored आवृत्तीमध्ये काही अॅक्शन दृश्ये आणि संवाद समाविष्ट होते. शिव्या आणि आक्रमक दृश्यांमधले संवाद म्यूट करण्यात आले नव्हते. बाकी विशेष असं काही नव्हतं, असं ती फॅन म्हणाली. फक्त 'धुरंधर २'चं uncensored व्हर्जन पाहण्यासाठी तब्बल २० तासांची फ्लाईट पकडून ही चाहती अमेरिकेत गेली होती. एकूणच 'धुरंधर २'च्या या डाय हार्ड फॅनने चित्रपट पाहण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून सर्वच थक्क झाले आहेत.सेन्सॉर बोर्डाची कात्री?
भारतात चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने काही हिंसाचाराच्या दृश्यांवर आक्षेप घेतला होता. मात्र, परदेशात चित्रपट प्रदर्शित करताना तिथल्या नियमांनुसार निर्मात्यांनी 'अनसेन्स़ॉर्ड' व्हर्जन रिलीज केलं. याशिवाय भारतात 'धुरंधर २' रिलीज झाल्यावर त्याच्या शिव्याही म्यूट करण्यात आल्या. त्यामुळे या चाहतीला कोणतेही कट नसलेलं 'धुरंधर २'चं व्हर्जन पाहता आलं.
अद्याप दिग्दर्शक आदित्य धर किंवा निर्मात्यांनी या '६ मिनिटांच्या अनसेन्सॉर्ड सीन'वर अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. 'धुरंधर २'च्या कमाईबद्दल सांगायचं तर अवघ्या काही दिवसांत जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली असून, हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत आहे.
Web Summary : A fan watched 'Dhurandhar 2' in America and saw six minutes of extra footage. The uncensored version had more action scenes and uncensored dialogues. The fan flew to America to see it.
Web Summary : एक फैन ने अमेरिका में 'धुरंधर 2' देखी और छह मिनट अतिरिक्त फुटेज देखा। अनसेंसर्ड वर्जन में अधिक एक्शन सीन और अनसेंसर्ड संवाद थे। फैन इसे देखने के लिए अमेरिका गई।