‘डर २.०’च्या मिनी सीरीजचा टीझर रिलीज !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 12:51 IST
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपट आपल्याला माहित आहेच.
‘डर २.०’च्या मिनी सीरीजचा टीझर रिलीज !!!
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपट आपल्याला माहित आहेच. आता या चित्रपटाची मिनी सीरीज ‘डर २.०’ लवकरच पे्रक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा टीझर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरुखचा ‘डर’ हा चित्रपट १९९३ मध्ये प्रदर्शित रिलीज झाला होता.टीझरची सुरुवात म्युझिकनेच करण्यात आली असून, यामध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याचा ट्रेण्ड दाखवण्यात आला आहे. मात्र, सुरुवातीची काही मिनिटं झाल्यानंतर म्युझिक आणि टीझरही अत्यंत गंभीर वळणावर जातं आणि फेसबुकवरील तरुणींच्या फोटोवर कम्प्युटरचं माऊस फिरताना दिसतं.यामध्ये एक तरुण फोटो शेअर करताना दाखवण्यात आला आहे आणि टीझरच्या शेवटी शाहरुख स्टाईलमध्ये एक तरुण स्क्रीनवर हात फिरवतो आणि म्हणतो, लव्ह यू कि...कि...किरण!सायबर क्राईमवर आधारित हा सिनेमा असून, वाय फिल्मच्या बॅनरखाली बनवली जात आहे. पाच भागात ही मिनी सीरीज बनवली गेली आहे.