Join us

फवाद-अनुष्का पाकिस्तानी लव्हबर्ड्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 14:26 IST

‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटात फवाद खानचा रोल आता वाढला असून तो आणि अनुष्का यांनी पाकिस्तानी लव्हबर्ड्सची ...

‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटात फवाद खानचा रोल आता वाढला असून तो आणि अनुष्का यांनी पाकिस्तानी लव्हबर्ड्सची भूमिका केली आहे. ते दोघे कराची येथून आलेले असतात. ते एकमेकांना एका फॉरेन देशात भेटतात.फवाद हा डीजे असतो. आणि अनुष्का ही नवाबी कुटुंबातील असते. सुत्रांनुसार, ‘ ते दोघे बाहेर देशात एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण एकदा ते कराचीला परततात. तेव्हा फवाद अनुष्काच्या कुटुंबियांना भेटून तिचा हात मागतो.पण तो खालच्या वर्गातील असल्याने त्याला परत पाठवण्यात येते. नाराज झालेली अनुष्का घरही सोडते. खरंतर, हा एक सस्पेन्स आहे की, ते पुन्हा एकत्र येतात की नाही?करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणबीर क पूरही मुख्य भूमिकेत दिसतील.