Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये दिसणार का फातिमा सना शेख?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 16:08 IST

आमिर खानची आॅनस्क्रीन मुलगी फातिमा सना शेख हिच्या ‘दंगल’मधील अभिनयाने अनेकांना प्रभावित केले. गीता कुमारी फोगाटच्या भूमिकेसाठी फातिमा सना ...

आमिर खानची आॅनस्क्रीन मुलगी फातिमा सना शेख हिच्या ‘दंगल’मधील अभिनयाने अनेकांना प्रभावित केले. गीता कुमारी फोगाटच्या भूमिकेसाठी फातिमा सना शेखने बरीच मेहनत घेतली. तिची ती मेहनत पडद्यावर स्पष्टपणे दिसली. पहिल्याच चित्रपटात फातिमाला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत काम करायला मिळाले आणि तिने या संधीचे चीज केले. कदाचित याच कष्टाच्या जोरावर फातिमाला आणखी अशीच एक मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. तेही पुन्हा एकदा आमिर खान याच्यासोबत. होय, मीडियाचे मानाल तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटासाठी फातिमा लीड फिमेल रोलमध्ये दिसू शकते. ALSO READ : ‘दंगल’ गर्लचा पहा सुपरहॉट अंदाज‘दंगल गर्ल्स’ सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेखच्या मैत्रीमध्ये शाहरुख खानमुळे का पडली फूट?या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आमिर खान मुख्य भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटात फिमेल लीड कोण असणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. तूर्तास फातिमा सना शेख हिचे नाव या भूमिकेसाठी चर्चेत आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी आलिया भट्ट आणि वाणी कपूरचे नाव चर्चेत होते.  आलियाच्या नावावरून आमिर आणि चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचीही चर्चा होती. आमिरला या चित्रपटात आलिया हवी होती. तर आदित्य चोप्रा याला वाणी कपूर. अर्थात डेट्स जुळत नसल्याने आलिया स्वत: या चित्रपटातून अंग काढून घेतले. उरली वाणी कपूर तर तिनेही मी या चित्रपटात नाही, असे साफ जाहिर केले. त्यानंतर श्रद्धा कपूर हिच्या नावाची चर्चा सुरु झाली. श्रद्धाने या चित्रपटासाठी लूक टेस्ट दिल्याचेही सांगितले गेले. केवळ श्रद्धाच नाही तर ‘कुमकुम भाग्य’फेम मृणाल ठाकूर हिचे नावही समोर आले. अद्याप तरी या चित्रपटातील फिमेल लीड ठरलेली नाही. आता वाणी, श्रद्धा, मृणाल व फातिमा यांच्यातून या चित्रपटात कुणाची वर्णी लागते, ते बघूच.