Join us

आमिर खानसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच फातिमा सना शेखने दिली ही प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:19 IST

आमिर आणि फातिमाच्या अफेअरची प्रचंड चर्चा सुरू असली तरी त्या दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले आहे. पण फातिमा सना शेख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर भरभरून बोलली आहे.

ठळक मुद्देमाझ्याबद्दल जी काही चर्चा सुरू आहे, हे खूपच विचित्र आहे. एकदा माझी आई टीव्ही पाहात होती आणि टिव्ही पाहाताना तिने मला हाक मारली आणि म्हणाली तुझा फोटो टिव्हीवर दाखवत आहेत. त्या खाली काय हेडलाईन आहे हे मी वाचायला गेले तर मला धक्काच बसला. सुरुवातीला या गोष्टीचा मला खूप त्रास झाला होता. लोकांना या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे मला त्यावेळी वाटत होते. पण लोक माझ्याबाबत काय विचार करतात, माझ्याबाबत काय बोलतात याबाबत मी कोणालाही काहीही सांगायची गरज नाहीये असे मला वाटते.  

‘दंगल’मध्ये फातिमा सना शेखने गीता फोगटची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटात फातिमा आमिरच्या मुलीच्या भूमिकेत होती. या चित्रपटातील फातिमाच्या भूमिकेची देखील चांगलीच चर्चा झाली होती.

या चित्रपटानंतर आमिरच्या पुण्याईने फातिमाला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही. आमिरनेच यशराज फिल्म्सकडे फातिमाची या चित्रपटासाठी शिफारस केली होती. यादरम्यान ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मध्ये फातिमाला कास्ट केल्यामुळे आमिरची पत्नी किरण राव नाराज असल्याची बातमीही आली होती. त्याआधी तर फातिमा आणि आमिरबद्दल वेगळीच चर्चा रंगली होती. आमिर आणि फातिमाच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या दबक्या आवाजात सुरू होत्या. दोघेही परस्परांच्या बरेच जवळ आले आहेत आणि हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय, अशी ही चर्चा होती. या बातम्यांनी किरण राव अस्वस्थ असल्याचेही कानावर आले होते. 

आमिर आणि फातिमाच्या अफेअरची प्रचंड चर्चा सुरू असली तरी त्या दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले आहे. पण फातिमा सना शेख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर भरभरून बोलली आहे. तिच्यामते सध्या या सगळ्या अफवा ऐकण्याची तिला सवयच झाली आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, माझ्याबद्दल जी काही चर्चा सुरू आहे, हे खूपच विचित्र आहे. एकदा माझी आई टीव्ही पाहात होती आणि टिव्ही पाहाताना तिने मला हाक मारली आणि म्हणाली तुझा फोटो टिव्हीवर दाखवत आहेत. त्या खाली काय हेडलाईन आहे हे मी वाचायला गेले तर मला धक्काच बसला. सुरुवातीला या गोष्टीचा मला खूप त्रास झाला होता. लोकांना या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे मला त्यावेळी वाटत होते. पण लोक माझ्याबाबत काय विचार करतात, माझ्याबाबत काय बोलतात याबाबत मी कोणालाही काहीही सांगायची गरज नाहीये असे मला वाटते.   

 

टॅग्स :फातिमा सना शेखआमिर खान