Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडील के.के.सिंग म्हणाले, सुशांतला फाशी घेताना कुणीच बघितले नाही, जेव्हा मुलगी पोहोचली तेव्हा तो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:59 IST

कुणीही माझ्या मुलाला फाशी घेताना बघितले नाही...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वडील के.के.सिंग यांनी मंगळवारी सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात सांगितले की आता त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेला मुखाग्नि देण्यासाठी कोणीही नाही. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, 'मी पाटण्यातील आहे आणि माझ्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी माझा मुलगा राहिला नाही.  कुणीही माझ्या मुलाला फाशी घेताना बघितले नाही. जेव्हा माझी मुलगी तिकडे पोहोचली तेव्हा सुशांत बेडवर पडलेला होता. सुशांतच्या वडिलांनी सांगितले की, या प्रकरणात तपासाची गरज आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाची चौकशी ईडी आणि CBI ने सुरु केली आहे. मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने हे प्रकरण पाटणा येथून मुंबईकडे द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. रियाच्या याचिकेवर सीबीआयने सुशांतच्या मृत्यूची किंवा मुंबई पोलिसांची चौकशी करावी, या विषयावर सर्वोच्च न्यायालयात बराच वेळ चर्चा सुरू होती. गुरुवारी या प्रकरणात न्यायालय निर्णय देऊ शकेल.

रिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्डवरून बरीच माहिती समोर येत आहे. कॉल रेकॉर्डवरून असे कळतेय की रिया आमिर खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, आदित्य रॉय कपूर, राणा डग्गुबाती, सनी सिंग आणि दिवंगत कोरियोग्राफर सरोज खान यांच्या संपर्कात होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत