Join us

वडिलांनी घराबाहेर काढून हातात दिली होती सूटकेस, आयुष्माने शेअर केला स्ट्रगलीं डेजचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 13:22 IST

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याला इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही. त्यामुळे  इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सोपा ...

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याला इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही. त्यामुळे  इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली आहे.  अनेक शो चे अँकरींग करतानासुद्धा आपण त्याला पाहिले आहे. मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे त्यांने आपल्या चित्रपटातील करिअरची सुरुवात कशी केली. याचा खुलासा खुद्द आयुष्मानने एका इंटरव्ह्रु दरम्यान केला आहे. आयुष्मान म्हणाला की, करिअरची सुरुवात माझ्या वडिलांमुळे झाली.  आयुष्मानने बॉलिवूडमध्ये एंट्री 2012 साली आलेल्या विकी डोनर चित्रपटातून केली. या चित्रपटात तो यामी गौतम सोबत दिसला होता. आयुष्मान एक चांगला अभिनेता होण्याबरोबरच एक दमदार गायकसुद्धा आहे. आयुष्मानने पाच वर्ष रंगभूमीवर काम केले होते. त्याला आधापासूनच अभिनयात करिअर करायचे होते म्हणून त्यांने  मास कम्युनिकेशनचा कोर्स केला मग विचार केला चांगली बॉडी बनवूया आणि हॉर्स रायडिंग शिकून मग मुंबईत येऊया. मात्र माझ्या वडिलांनी सांगितले जर तू मुंबईत आता गेला नाहीस तर पुढचे दोन वर्ष तुला काही काम मिळणार नाही. आयुष्मानचे वडिल प्रसिद्ध एस्ट्रोलॉजर आहेत.  आयुष्मान पुढे म्हणाला, त्या दरम्यान माझी जर्नलिझमची परीक्षा सुरु होती. जशी परीक्षा संपली माझी बॅग पॅक करण्यात आली. माझ्यात हातात टिकट काढून देण्यात आले आणि मला घरातून बाहेर काढण्यात आले. हिरो बनण्यासाठी लोक घर सोडून मुंबईत पळून येतात मात्र इकडे माझ्या घरातल्यांनीच मला मुंबईत जाण्याकरिता बाहेर काढले होते. लवकरच आयुष्मान सान्या मल्होत्रासोबत बधाई या चित्रपटात दिसणार आहे. बधाई'चे दिग्दर्शन अमित शर्मा करणार आहे. या आधी त्यांने अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट 'तेवर'चे दिग्दर्शन केले आहे.  आनंद एल राय दिग्दर्शित शुभ मंगल सावधान चित्रपटातील भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुराणाची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. तसेच बरेली की बर्फी हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचून आणण्यास यशस्वी ठरला.