Join us

वडिलांना वाटत होतं,‘मी क्रिकेटर व्हावं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 11:30 IST

 सलमान खानचा चित्रपट ‘सुल्तान’ नुकताच रिलीज झाला. चित्रपटाला प्रचंड पसंती प्रेक्षकांकडून मिळत आहे. पण, त्याचे वडील सलीम खान यांना ...

 सलमान खानचा चित्रपट ‘सुल्तान’ नुकताच रिलीज झाला. चित्रपटाला प्रचंड पसंती प्रेक्षकांकडून मिळत आहे. पण, त्याचे वडील सलीम खान यांना नेहमी वाटत असे की, ‘ सलमानने क्रिकेटर बनावे. देशासाठी क्रिकेट खेळून क्रिकेटविश्वात नाम कमवावे. पण, मी कधीच पहाटे ५ वाजता क्रि केटच्या प्रॅक्टिससाठी गेलो नाही.कलाकाराचे आयुष्यच माझ्यासाठी एवढे कठीण आहे, तर क्रिकेटरचे तर किती कठीण असले असते.’ सलमान म्हणतो,‘ तो एरव्ही चांगलं खेळायचा. पण, नेमके ते माझा क्रिकेट पहायला आले की, नेमकं मला क्रिकेट खेळताच यायचे नाही. ’ तो पुढे सांगतो,‘ सलीम दुर्रानी हे माझे क्रि केटचे कोच होते.पहिल्याच दिवशी त्यांनी मला खेळतांना पाहिलं, मी खुप चांगला खेळलो. दुसºया दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना बोलावलं आणि सांगितलं की, क्रिकेटमध्ये मला ब्राईट फ्युचर आहे. तेव्हापासून त्यांना वाटू लागले की, मी क्रिकेटर व्हावे. खरंतर मला दिग्दर्शक व्हायचे होते. ते स्वप्न मी आजही जगतोय.’