एक्स वाईफ अधुनाला बॉयफ्रेन्डच्या मिठीत पाहून फरहान अख्तरने दिली अशी प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 15:33 IST
घटस्फोटानंतरही मैत्री, हे बॉलिवूडसाठी नवे नाही. अभिनेता फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांच्याबद्दलही हेच आहे. फरहान व अधुना या ...
एक्स वाईफ अधुनाला बॉयफ्रेन्डच्या मिठीत पाहून फरहान अख्तरने दिली अशी प्रतिक्रिया!
घटस्फोटानंतरही मैत्री, हे बॉलिवूडसाठी नवे नाही. अभिनेता फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांच्याबद्दलही हेच आहे. फरहान व अधुना या दोघांनी सोळा वर्षांचा संसार केल्यानंतर २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पुढे दोघांनीही घटस्फोट घेतला. पण घटस्फोटानंतरही फरहान व अधुना चांगले मित्र आहेत. गुरुवारी याचा पुरावा सगळ्यांना बघायला मिळाला. होय, नावाजलेली हेअर स्टाईलिस्ट आणि बी ब्लंट या हेअर सलूनची मालकीन असलेल्या अधुनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बॉयफ्रेन्ड व मित्रांसोबतचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये अधुना तिचा बॉयफ्रेन्ड निकोलो मोरियोसोबत दिसते आहे. एक्स वाईफचे बॉयसोबतचे हे फोटो फरहानने अतिशय खिलाडूवृत्तीने घेतले. त्याने त्यावर प्रतिक्रियाही दिली. ‘बढिया जर्सी, तुम्ही सगळे चांगले दिसत आहात. पण खाली उजव्या बाजूला जो फोटो आहे, तो ‘बॉम्ब’ आहे. हाहाहा,’असे फरहानने लिहिले. अधुनाचा बॉयफ्रेन्ड निकोलो हा अभिनेता डिनो मोरियोचा भाऊ आहे. फरहान आणि अधुना ‘दिल चाहता है’ या चित्रपटादरम्यान भेटले होते. दिग्दर्शक म्हणून फरहानचा हा पहिलाच चित्रपट होता. दोघेही तब्बल तीन वर्षे एकमेकांना डेट करीत होते. त्यादरम्यान ते दोघे नेहमीच कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये बघावयास मिळत होते. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर पुढे हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले होते. या जोडप्याला शाक्या आणि अकिरा नावाच्या मुली आहेत. मात्र नंतरच्या काळात त्यांच्यात दरार निर्माण झाल्यानेच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. फरहान आणि अधुनाच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर जबाबदार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. फरहान आणि श्रद्धाची वाढती मैत्री अधुनाला अजिबात पसंत नव्हती. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.