Join us

​फरहान बनणार ‘डॉन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 11:42 IST

शाहरूख खानला डॉन बनवणारा अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तर आता स्वत:च अंडरवर्ल्ड डॉन बनणार आहे. होय, गँगस्टर अरूण गवळी ...

शाहरूख खानला डॉन बनवणारा अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तर आता स्वत:च अंडरवर्ल्ड डॉन बनणार आहे. होय, गँगस्टर अरूण गवळी याच्यावरील ‘डॅडी’ या बायोपिकमध्ये फरहान कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भूमिका साकारत आहे. आशिम अहलुवालिया दिग्दर्शित या चित्रपटात अर्जून रामपाल अरूण गवळीच्या मुख्य भूमिकेत आहे. ‘डॅडी’मध्ये फरहान कॅमिओ करताना दिसेल. या  दृश्याचे चित्रीकरणही आटोपले आहे. म्हणजेच रूपेरी पडद्यावर प्रथमच फरहान डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.‘डॉन’च्या रिमेकमध्ये फरहानने शाहरूखला डॉन बनवले होते. हा चित्रपट फरहानने दिग्दर्शित केला होता. पण आता फरहान स्वत:च डॉन बनणार म्हटल्यावर त्याचे चाहते त्याला पाहण्यास उत्सूक असणारच. यावर्षी रिलीज झालेल्या ‘वजीर’मध्ये त्याने एटीएस अधिकाºयाची भूमिका साकारली होती. लवकरच फरहानचा ‘रॉक आॅन2’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात तो रॉक सिंगरच्या भूमिकेत दिसेल.