-आणि श्रद्धाबद्दल बोलला फरहान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2016 15:24 IST
सध्या बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूर व फरहान अख्तर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. विशेषत: मीडियात या दोघांच्या सीक्रेट अफेअरच्या बातम्या ...
-आणि श्रद्धाबद्दल बोलला फरहान!
सध्या बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूर व फरहान अख्तर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. विशेषत: मीडियात या दोघांच्या सीक्रेट अफेअरच्या बातम्या चांगल्याच रंगत आहेत. अर्थात फरहान व श्रद्धा दोघांनीही वेळोवेळी या चर्चेत काहीही दम नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण तरिही फरहान जिथे जाईल, तिथे त्याला श्रद्धाबद्दलचा प्रश्न विचारला जातोच. वारंवार विचारल्या जाणा-या या प्रश्नांना फरहानही वैतागला आहे. कारण एकदा पुन्हा त्याने हा प्रश्न विचारणा-यांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. माझ्याबद्दल तुम्हाला जे लिहायचे, जे छापायचे ते छापा. माझ्या आयुष्यावर याचा काहीही फरक पडणारा नाही. तुम्ही जे बोलताय, त्यात मला काहीही तथ्य दिसत नाही. यावर मी कसलीही प्रतिक्रिया देणार नाही,असे फरहान म्हणाला.फरहान व श्रद्धा सध्या ‘रॉक आॅन2’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांचीही जवळीक कुणापासूनही लपून राहिलेली नाही. प्रत्येक प्रमोशनल इव्हेंटमध्ये फरहान श्रद्धाची जरा जास्तच काळजी घेताना दिसतो. श्रद्धामुळेच फरहान व त्याची पत्नी अधुना यांच्यात दुरावा आल्याच्या बातमीनंतर खरे तर तर फरहानच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवावा, हे ठाऊक नाही. अगदी अलीकडे श्रद्धा फरहानवर नाराज असल्याचीही आली होती. श्रद्धाने ‘रॉक आॅन2’ या चित्रपटाची काही गाणी गायली आहेत, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. मात्र श्रद्धा या गाण्याच्या रेकॉर्डिंबद्दल समाधानी नव्हती. ही गाणी पुन्हा नव्याने रेकॉर्ड केली जावीत, अशी तिची इच्छा होती. मात्र फरहानने यास स्पष्ट नकार दिला. गाणी जशी आहेत, तशीच राहू द्यायची, यावर तो ठाम होता. यामुळेच श्रद्धा दुखावली गेल्याचे कळते. आता खरे काय नि खोटे काय, हे येत्या काळात कळेलच.‘रॉक आॅन2’मध्ये श्रद्धा व फरहानसोबतच अर्जून रामपाल याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.