फरहानने फेसबुकवर व्यक्त केले दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:31 IST
उत्तर प्रदेशातील दादरी येथे गाईचे मांस खाल्ल्यावरून इरफान नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ...
फरहानने फेसबुकवर व्यक्त केले दु:ख
उत्तर प्रदेशातील दादरी येथे गाईचे मांस खाल्ल्यावरून इरफान नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यावर आता वैचारिक चर्चाही सुरू झाली आहे. अनेक सेलिब्रिटीसुद्धा या घटनेचा निषेध करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यात अभिनेता फरहान अख्तरही आहे. त्याने नुकताच फेसबूकवरून या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणी योग्य तो न्याय मिळायला हवा. समाजातील एखादा विशिष्ट लोकांचा समूह कायदा हातात घेऊन वाटेल ते करू शकत नाही. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यायला हवी. त्यामुळे समाजात संदेश जाईल की, अशा प्रवृत्तींना भारतीय संविधानात योग्य शिक्षा मिळते, असे फरहानने म्हटले.