Join us

प्रसिद्ध अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 18:13 IST

अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

आज सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेकांनी आपल्या परिसरात किंवा घरीच झेंडावंदन करुन आजचा दिवस साजरा केला. सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान एका अभिनेत्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तिरंगाच्या रंगात बनवलेला पॅराशूट घेऊन अभिनेता पॅराग्लायडिंग करत आहे असा तो फोटो आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' फेम अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar)  हा फोटो पोस्ट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये तो पॅराग्लायडिंग करताना दिसतोय तर खाली शहराचा सुंदर नजारा पाहायला मिळतोय. तसंच यासाठी वापरलेलं पॅराशूट हे तिरंग्याच्या रंगामध्ये आहे. फरहानचा हा फोटो चाहत्यांना भलताच आवडला आहे. "एकोपा असेल तर आपण उडू आणि वेगळे झालो तर खाली पडू" असा संदेशही त्याने लिहिला आहे.

फरहानच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमात फरहानला स्काय डायव्हिंगची प्रचंड भीती असते असं दाखवण्यात आलं आहे. तर या पोस्टवर नेटकऱ्यांनी 'पॅराग्लायडिंगची भीती गेली का?'अशी कमेंट केली आहे. तर काही जणांनी त्याला 'बॅगवती' ची आठवण करुन दिली आहे. अनेकांना फरहानची ही पोस्ट पाहून त्या सिनेमाचीच आठवण झाली आहे.

टॅग्स :फरहान अख्तरप्रजासत्ताक दिन २०२४सोशल मीडिया