Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डॉन ३'ला ब्रेक, फरहान अख्तर आता 'या' सिनेमाची तयारी करणार; ४ वर्षांपूर्वीच केलेली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:13 IST

रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर फरहान अख्तरचा 'डॉन ३' रखडला, आता 'या' सिनेमाची तयारी सुरु करणार

फरहान अख्तरचा प्रोजेक्ट 'डॉन ३'ला काही मुहुर्तच लागत नाहीये. आधी शाहरुख खानने सिनेमा करायला नकार दिला. नंतर रणवीर सिंहच्या नावाची घोषणा झाली. मात्र नंतर रणवीरही सिनेमातून बाहेर पडला. आता सिनेमाचं भवितव्य काय अशी चर्चा सुरु झाली. याआधी फरहानचाच प्रोजेक्ट 'जी ले जरा'चीही काही वर्षांपूर्वीच घोषणा झाली होती. मात्र त्याचंही पुढे काही घडलं नाही. आता मात्र फरहान 'डॉन ३'ला ब्रेक लावून 'जी ले जरा' सिनेमाची तयारी करणार असल्याची चर्चा आहे. 

'जी ले जरा' सिनेमाची चार वर्षांपूर्वीच घोषणा झाली होती. यामध्ये कतरिना कैफ, प्रियंका चोप्रा आणि आलिया भट अशा तीन तगड्या अभिनेत्रींची सिनेमात वर्णी लागली. आता इतक्या मोठ्या गॅपनंतर या तिघी सिनेमा करणार का यावर संभ्रमच आहे. पिंकव्हिला रिपोर्टनुसार, फरहानला डॉन ३ च्या कास्टिंगवर विचार करायला लागणार आहे. विचारपूर्वक यासंदर्भात त्याला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे यासाठी बराच वेळ जाणार आहे. या दरम्यान फरहान 'जी ले जरा'वर काम करण्याच्या विचारात आहे.

मधल्या काळात असंही म्हटलं गेलं की सिनेमा डबाबंद झाला आहे ज्यामुळे चाहते निराश झाले होते मात्र फरहानने सिनेमा नक्कीच बनवेन अशी प्रतिक्रिया दिली होती. सिनेमाची स्क्रिप्टही फायनल झाली आहे. काही महिन्यांपूर्वी फरहान सिनेमाच्या शूट लोकेशनसाठी भ्रमंतीही करत होता. याचे त्याने फोटो शेअर केले होते. तीन अभिनेत्रींच्या तारखा न जुळल्याने सिनेमाचं शूट सुरु होण्यास विलंब झाला. आता सगळं सुरळीत झालं तर यावर्षीच सिनेमाचं शूट सुरु होईल असा अंदाज आहे. फरहान सध्या तीनही अभिनेत्रींसोबत चर्चा करत आहे. 

कतरिनाने गेल्या महिन्यातच बाळाला जन्म दिला आहे. काही वर्षांपासून ती सिनेमात दिसलेली नाही. प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये व्यग्र आहे. यासोबत ती साउथ सिनेमातही दिसणार आहे. तर आलिया भट सध्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमाचं शूट करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Don 3' on hold; Farhan Akhtar preps for 'Jee Le Zaraa'.

Web Summary : Farhan Akhtar postpones 'Don 3' due to casting issues. He will now focus on 'Jee Le Zaraa' starring Katrina, Priyanka, and Alia. Script is final; shoot may begin this year, pending actresses' schedules.
टॅग्स :फरहान अख्तरबॉलिवूड