Join us

 फरहान अख्तरचा मोठा खुलासा! या महिन्यात करणार गर्लफ्रेन्ड शिबानीसोबत लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 12:54 IST

अभिनेता फरहान अख्तर व अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. सोशल मीडियावरही या कपलचे रोमॅन्टिक फोटोंची धूम आहे. आता फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते.

अभिनेता फरहान अख्तर व अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. सोशल मीडियावरही या कपलचे रोमॅन्टिक फोटोंची धूम आहे. आता फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार, लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द फरहानने हा खुलासा केला आहे.होय, फरहान अलीकडे भूमी पेडणेकरच्या ‘टेप कास्ट सीझन 2’ या चॅट शोमध्ये दिसला. या शोमध्ये भूमीने फरहानसोबत ‘डोन्ट प्ले’ गेम खेळला. या खेळात भूमीने फरहानला एक आॅडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये शिबानीचा आवाज होता. शिबानी फरहानला एक प्रश्न विचारत होती. आपण कधी लग्न करतोय, एप्रिल वा मे मध्ये. कारण मी खूप कंफ्यूज आहे, असा हा प्रश्न होता. शिबानीचा हा प्रश्न ऐकताच, फरहानचा चेहरा खुलला. त्याच्या चेहºयाभर हसू पसरले. यानंतर आपण कदाचित एप्रिल वा मे महिन्यात लग्न करू शकतो, असे उत्तर त्याने दिले.

अलीकडे फरहानने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत शिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती. या फोटोवरून दोघांनीही साखरपुडा केल्याचे मानले जात आहे.

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते. कामाबाबत बोलायचे झाले तर फरहान ‘द स्काज इज पिंक’या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकर