बॉलिवूड अभिनेता फरदीन खान गेल्या 4 वर्षांपासून ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे. 2016 नंतर फरदीन बॉलिवूडमधून जणू गायब झाला. मध्यंतरी तो पुन्हा दिसला पण त्याला पाहून लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. होय, वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखताही येईना. आता पुन्हा एकदा फरदीनला पाहून लोक थक्क आहेत. फरदीन पुन्हा एकदा पूर्वीसारखा फिट झाला आहे.
नुकताच फरदीन मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला. यादरम्यानचे त्याचे फोटो व्हायरल झालेत आणि हे फोटो पाहून चाहते हैराण झालेत. गोलमटोल फरदीन इतक्या कमी वेळात इतका फिट कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला. यावेळी फरदीनने ग्रे कलकरची टी-शर्ट आणि काळी पॅन्ट कॅरी केली होती.
काही वर्षांपूर्वी फरदीनचे वजन खूप वाढले होते. वयापेक्षा तो अधिक म्हातारा दिसू लागला होता. यावरून लोकांनी त्याला ट्रोलही केले होते. या ट्रोलर्सला त्यावेळी त्याने सणसणीत उत्तर दिले होते. माझे वजन वाढल्यामुळे लोक मला ट्रोल करत आहेत. पण याबद्दल ना वाईट वाटतेय, ना लाजीरवाणे. ना मी डिप्रेशनमध्ये आहे. मी अगदी आनंदात जगतोय. कोणाचीही अशी खिल्ली उडवण्यापूर्वी लोकांनी एकदा विचार करायला हवा, असे तो म्हणाला होता.
होय, 2001 साली फरदीनला कोकेन खरेदी करताना रंगेहात पकडले गेले. यानंतर त्याला अटकही झाली. पाठोपाठ रिहॅब सेंटरमध्ये त्याची रवानगी झाली. या प्रकरणाने अनेक वर्षे फरदीनचा पाठपुरावा केला. अखेर 2012 साली त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली.
लव्ह के लिए कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी, ऑल द बेस्ट अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केले. पण अचानक का कुणास ठाऊक त्याने चित्रपटांतून बे्रेक घेतला. यानंतर अनेक वर्षे तो बॉलिवूडमधून गायब झाला.