Join us

​ फराह खानचा पती शिरीष कुंदरला ऐन भाऊबीजेला झाली दुर्बद्धी! मग झाले असे काही...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 10:26 IST

भाऊबीजेला सगळ्यांनी आपल्या भावांची आठवण झाली. पण बॉलिवूड अभिनेत्री, दिग्दर्शक, कोरिओग्राफर फराह खान हिचा पती शिरीष कुंदर याला मात्र ...

भाऊबीजेला सगळ्यांनी आपल्या भावांची आठवण झाली. पण बॉलिवूड अभिनेत्री, दिग्दर्शक, कोरिओग्राफर फराह खान हिचा पती शिरीष कुंदर याला मात्र भाऊबीजेच्या दिवशी भलत्याचीच आठवण झाली आणि मग सोशल मीडियावर शिरीषला ट्रोल व्हावे लागले. २१ आॅक्टोबरला शिरीषने भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्याना काय दुर्बुद्धी सुचली ठाऊक नाही. भाऊबीजेच्या शुभेच्छा देताना त्याने दाऊद इब्राहिमचा फोटो पोस्ट केला. मग काय, नेटिजन्सनी त्याला चांगलेच आडव्या हातांनी घेतले.तू याला भाऊ म्हणू शकतोस. उर्वरित सगळ्यांसाठी तर तो फक्त एक गुन्हेगार आहे, असे एका युजरने लिहिले. एकाने तर थेट शिरीषच्या सेन्स आॅफ ह्युमरवरचं टीका केली. तुझा सेन्स आॅफ ह्युमर तुझ्या बोगस चित्रपटांइतकाच बोगस आहे, असे या युजरने म्हटले. एका युजरने शाहरूख खान व शिरीष या दोघांमधील एका जुन्या वादाचा संदर्भ देत,‘शाहरूखने तुझ्या थोबाडीत हाणली, तेव्हा तू याच भाईकडे तक्रार केली होती का?’, असा सवाल केला. भाऊबीजेसारख्या सणाची टर का उडवतो आहेस? असा आणखी एक सवाल एका युजरने केला. अद्याप शिरीषने नेटिजन्सच्या या कमेंट्सला उत्तर दिलेले नाही. आता तो काय उत्तर देतो आणि त्यामुळे नेटिजन्सचा संताप कसा कमी होतो, ते बघूच.ALSO READ: shocking: ​फरहा खानने शिरिष कुंदरसोबत लग्न करण्याआधी तिच्या आयुष्यात आला होता हा अभिनेताशिरीषने सन २००४ मध्ये फराह खानसोबत लग्न केले होते. फराह त्याच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठी आहे. ‘मैं हूं ना’ या चित्रपटाच्यादरम्यान दोघांची भेट झाली होती. २००८ मध्ये फराहने तिळ्यांना जन्म दिला. २०१२ मध्ये अभिनेता संजय दत्तच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटाची सक्सेस पार्टी होती. या पार्टीत शाहरूख व शिरीष या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. शाहरूखने भर पार्टीत शिरीषच्या थोबाडीत मारली होती. त्यापूर्वी २०११ मध्ये शिरीषने शाहरूखच्या ‘रा वन’ या चित्रपटाची टर उडवली होती. ‘रा वन’मध्ये सुपरहिरोंच्या सर्व शक्ती आहेत. मात्र मनोरंजन नाही,’ असे टिष्ट्वट शिरीषने केली होते.